Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

मागील काही दिवसांत विमानामध्ये प्रवाशांसोबत घडणार्‍या अनेक अप्रिय घटना समोर येत आहेत. अशातच आता दिल्ली- न्युयॉर्क American Airlines च्या विमानातील अशीच एक घटना समोर आली आहे. महिला प्रवासीने केलेल्या तक्रारीनुसार ती एक कॅन्सर पीडीत असून विमानात फ्लाईट अटेंडंट ने तिला मदत नाकारत विमानातून खाली उतरले. नुकतीच त्या महिलेवर शस्त्रक्रिया झाली असल्याने ती ओव्हरहेड कम्पार्टमेंटमध्ये हॅन्ड बॅंग ठेवू शकत नव्हती. अमेरिकेला जात असलेल्या Meenakshi Sengupta ने विमानात तिला मिळालेल्या वागणूकीबाबत तिने तक्रार नोंदवली आहे.

30 जानेवारीचा हा प्रकार असून, Meenakshi Sengupta च्या तक्रारीनुसार तिला विमानात 5 पाऊंडसची बॅग उचलण्यास मदत मिळाली नाही. 31 जानेवारीला तिने याबाबत तक्रार नोंदवली. दिल्ली पोलिस आणि सिव्हिल एअर कडे तिने तक्रार नोंदवली. तिने आपल्या सीटपर्यंत पोहचवण्यासाठी व्हिलचेअर ची देखील मागणी केली होती. फार हालचाल करण्यावर मर्यादा असल्याचं तिने सांगितलं होतं.

मिनाक्षीच्या मते तिला ग्राऊंड स्टाफ कडून चांगली मदत मिळाली. मात्र विमानात गेल्यानंतर एअर हॉस्टेस सोबत बोलताना तिच्याकडे मदत मागितल्यावर कुणी फार मदत करण्याचे कष्ट घेतले नाही. विमान उड्डाणाची वेळ जशी जवळ आली तशी तिने मदत मागताच हे आपलं काम नसल्याचं तिने सांगितल्याचं मिनाक्षी सांगतात. मिनाक्षी यांनी स्वतःला जमत असल्यास करावं अन्यथा विमानातून खाली उतरावं अशा भाषेत तिच्याशी व्यवहार झाल्याचं सांगण्यात आलं. नक्की वाचा: Ruckus on Air Vistara Flight Incident: Abu Dhabi-Mumbai विमानात इटालियन महिलेचा हैदोस; अर्धनग्न अवस्थेत येरझार्‍या घालत केबिन क्रू ला देखील मारहाण .

सध्या सोशल मीडीयामध्ये हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. महिला प्रवासीची तक्रार महिला आयोग आणि Ministry of Civil Aviation ने ऐकावी असं तिचं मत आहे.