Delhi MCD Byelection Results: दिल्लीत झालेल्या पोटनिवडणूकीचे निकाल समोर आले असून आम आदमी पार्टीचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी 5 पैकी 4 जागा मिळाल्या असून शिल्लक राहिलेली 1 जागा ही काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. त्रिलोकपुरी, शालीमार बाग वॉर्ड, रोहिणी C आणि कल्याणपुरी सीटवर आप पक्षाने बाजी मारली आहे. तर पूर्व दिल्लीतील चौहान बांगड येथून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. पोटनिवडणूकीसाठी 28 फेब्रुवारीला मतदान झाले होते. यामध्ये 50 ट्क्क्यांहून अधिक मतदारांनी आपले मत दिले होते. या पाच वॉर्डमधील चार आपकडे तर शालीबार बाग नॉर्थचे प्रतिनिधी भाजपचे नगरसेवक होते. या पोटनिवडणूकीत भाजपला मात्र भोपळा मिळाला आहे.
निवडणूकीचे निकाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी असे म्हटले आहे की, दिल्लीतील नागरिकांनी आप पक्षाला 5 पैकी 4 जागांवर विजय मिळवून देत या पक्षाच्या राजकरणावर भरोसा दाखवला आहे. पण ज्या पद्धतीने भाजपचा पराभव झाला आहे त्यावरुन अशी गोष्ट दिसून येते की, जनता भाजपला कंटाळली आहे.(पश्चिम बंगाल येथे 7 मार्चला होणा-या PM Modi च्या मेळाव्यात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार? दिलीप घोष यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया)
पुढे त्यांनी एक ट्विट करत त्यात असे म्हटले आहे की, एमसीडी पोटनिवडणूकीत 5 पैकी 4 जागांवर विजय झाल्याने त्यांचे अभिनंदन. भाजपच्या राजकरणामुळे जनता आता नाराज झाली आहे. पुढील वर्षात होणाऱ्या MCD निवडणूकीत जनता अरविंद केजरीवाल यांची प्रामाणिकता आणि काम करणारे राजकरण घेऊन येईल.
Twitter:
एमसीडी उपचुनाव में 5 में से 4 सीटें जीतने पर आम आदमी पार्टी कार्यकर्ताओं को बधाई.
बीजेपी के शासन से दिल्ली की जनता अब दुखी हो चुकी है. अगले साल होने वाले MCD चुनाव में जनता @ArvindKejriwal जी की ईमानदार और काम करने वाली राजनीति को लेकर आएगी
— Manish Sisodia (@msisodia) March 3, 2021
आम आदमी पक्षाचे महानगरपालिका प्रभारी यांनी असे म्हटले आहे की, फार महत्वपूर्ण निवडणूक होती. कारण गेल्या 15 वर्षात भाजपचा पोटनिवडणूकीत पराभव झालाच नव्हता. मात्र यावेळी पूर्णपणे भाजपच्या हाती भोपळा आला आहे. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या निवडणूकीत सुद्धा जनता अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला मत देईल.