दिल्ली: सोन्याच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सराफा बाजारातील दर
सोन्याच्या भावात सातत्याने घसरण, सराफ बाजारमधील दर जाणून घ्या (Photo Credits-Facebook)

दिल्ली (Delhi) येथील स्थानिक सराफा बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. आज (25 एप्रिल) सोन्याच दर 150 रुपयांनी वाढले असून 32,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. त्याचसोबत चांदीचे सुद्धा 295 रुपयांनी दर वाढले आहेत. चांदीचा आजचा भाव 38,520 रुपये झाला आहे.

स्थानिक ज्वेलर्सच्या खरेदीत वाढ झाली असून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात घसरण झाली. त्यामुळेच सोन्याचांदीचे भाव वाढले आहेत. त्याचसोबत कच्च्या तेलाची मागणी आणि आयातदारांच्या डॉलर्सच्या मागणीमुळे रुपया 22 पैशांनी घसरला आहे. तर 70.08 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला आहे.(डोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये)

न्यूयॉर्क येथे सोन्याचे दर प्रति औंस 1278.50 डॉलर्स तर चांदीमध्ये दर कमी होत 14.99 डॉलर्स प्रति औंस झाला आहे. दिल्ली येथे 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे 99.5 टक्के सोन्याचा दर 32,700 रुपये झाला आहे.