सातव्या टप्प्यातील मतदान आणि रविवार (19 मे) पासून सुरु होणाऱ्या एक्झिट पोलपूर्वी सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे.ऑल इंडिया सराफा असोसिएशन यांच्या अनुसार, दिल्ली येथे सोन्याचे दर 160 रुपये प्रति 10 ग्रॅम कमी होऊन 33170 रुपये झाले आहेत. तसेच नाणे निर्माते आणि औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीचे दर 625 प्रति किलोग्रॅम कमी होऊन 37,625 रुपये झाले आहेत.
तसेच जागतिक स्तरावर सोन्याचे दर कमी होऊन 1286.50 डॉलर्स प्रति औंस आणि चांदी 14.48 डॉलर्स प्रति औंस असे झाली आहे. तर 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या दर प्रति 10 ग्रॅमसाठी 160 रुपयांनी कमी झाले आहेत.(Mastercard भारतात करणार 1 बिलीयन डॉलरची गुंतवणूक; पुण्यात उभा राहणार महत्वाचा प्रकल्प)
तर चांदीचे दर आठवड्याच्या खरेदीमुळे 702 रुपयांनी कमी होऊन 36,822 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या नाण्यांची किंमत स्थिर राहिली आहे.