सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या सराफा बाजारातील आजचे भाव
Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार होत असल्याचे दिसून येत आहे. तर शुक्रवारी सोन्याचे दरात 210 रुपयांनी वाढ झाली पण चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एक किलोग्रॅम चांदीचे दर 110 रुपयांनी कमी झाले आहेत. तर गुरुवारी दिल्ली सराफा बाजारातील सोन्याचे दर 348 रुपयांनी वाढले होते. तर 2 ऑक्टोंबरला गांधी जयंती निमित्त दिल्लीतील सराफा बाजार बंद ठेवण्यात आले होते.

HDFC सिक्युरिटी यांच्या मते दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचे भाव 210 रुपयांनी वाढल्याने ग्राहकांना 39,075 रुपयांना खरेदी करता येणार आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 348 रुपयांनी वाढून 39,115 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. मंगळवारी सोन्याचे दर 38,767 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

तर चांदीचे दर 110 रुपयांनी कमी होऊन 46,490 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी चांदीचे दर 46,600 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याचे दर पाहता किंमतीत वाढ झाली आहे. येत्या दरऱ्याच्या मुहूर्तापर्यंत सोन्याचे दर 40 हजारवर पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (दर वाढल्याने सोने विक्री 65 टक्क्यांनी घटली; रिसाइक्लिंग मोठ्या प्रमाणावर वाढले)

आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे.अक्षय्य मुहूर्त हा साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने यादिवशी कोणत्याच शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी विशेष मुहूर्ताची वेळ पहाण्याची गरज नसते. सोनं विकत घेताना त्याची शुद्धता तपासून घ्या.हॉलमार्कचे दागिने, त्याचा स्टॅम्प आणि पक्क बिल घेऊनच दागिने विकत घ्या.