दिल्ली: सोन्याचे दर 38 हजाराच्या घरात तर चांदी 45 हजार रुपये
Gold | Representational Image ( Photo Credits: Pixabay)

सोने आणि चांदीचे दर शुक्रवारी पुन्हा वाढले आहेत. दिल्ली सराफा बाजारात मागणी वाढल्याने सोन्याचे दर 38 हजाराच्या घरात पोहचले आहेत. तर चांदीचे भाव सुद्धा वाढले असून 45 हजार रुपये झाले आहेत. विशेषज्ञांच्या मते येत्या दिवाळी पर्यंत सोन्याचे दर 40 हजारावर पोहचण्याची शक्यका आहे.

शुक्रवारी 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचे दर 475 रुपयांनी वाढले आहेत. त्यानुसार 38,420 रुपये आणि 38,250 रुपये झाले आहेत. सोन्याच्या गिन्नीचा दर 28,700 रुपये प्रति आठ ग्रॅम झाला आहे. 12 ऑगस्ट रोजी सोने 38,470 रुपयांनी विकले गेले होते. मात्र आता पुन्हा सोन्याच्या दारत वाढ झाली आहे.(2000 वर्ष जुन्या श्रीकृष्णाच्या मूर्ती इंग्लंड कडून भारताकडे सुपूर्त, ध्वजारोहण सोहळ्यात उच्च आयुक्त रुची घनश्याम यांनी घेतला ताबा)

सराफा बाजारात चांदीचे दर 378 रुपयांनी वाढून 44,688 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. तर आठवडाभराची चांदीची विक्री पाहता 594 रुपयांनी वाढून 43,834 रुपये प्रति किलोग्रॅम त्याचे दर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता न्यूयॉर्क येथे सोने 1513 डॉलर प्रति औंस आणि चांदी 17.26 प्रति औंस झाली आहे.