Delhi Fire: दिल्लीतील शाहदरा (Shahdara) येथील भोलानाथ नगर भागात शुक्रवारी सकाळी एका निवासी इमारतीला आग (Fire) लागली. ही आग इतकी भीषण होती की, यात घरात उपस्थित असलेले संपूर्ण कुटुंब अडकले. मदत पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आतील लोकांची प्रकृती बिघडली होती. या दुर्दैवी घटनेत होरपळून आई आणि मुलाचा मृत्यू झाला. तसेच चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत दोघांना आपला जीव गमवावा लागला. शाहदरा येथील घर क्रमांक 197, गल्ली क्रमांक 11, भोलानाथ नगरमध्ये ही आगीची घटना घडली. (हेही वाचा -Fire Erupt At Kolkata Hospital: कोलकाता रुग्णालयात आग, कॅन्सर रुग्णाचा गुदमरून मृत्यू, पहा व्हिडिओ)
या आगीत 42 वर्षीय शिल्पी गुप्ता आणि त्यांचा 16 वर्षीय प्रणव गुप्ता यांचा मृत्यू झाला. आग लागताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी खोलीत पडलेल्या जखमींना जीटीबी हॉस्पिटलमध्ये नेले, जेथे 72 वर्षीय कैलाश गुप्ता, 70 वर्षीय भगवती गुप्ता, 45 वर्षीय मनीष गुप्ता आणि 19 वर्षीय पार्थ गुप्तावर उपचार सुरू आहेत. एफएसएल पथक घटनास्थळी तपास करत आहे. (हेही वाचा -Mumbai Fire: घाटकोपर येथील निवासी इमारतीला आग, 13 जण जखमी, रुग्णालायत उपचार सुरु)
दिल्लीतील शाहदरा भागात निवासी इमारतीला भीषण आग, पहा व्हिडिओ -
#WATCH | 2 died and 4 injured after a fire broke out in a house in Bholanath Nagar, Delhi. All the injured and deceased persons are members of the same family. The deceased seems to have died due to asphyxia. The FSL team has been called to the spot: DCP Shahdara pic.twitter.com/qWpkUYmF3a
— ANI (@ANI) October 18, 2024
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शाहदरा जिल्ह्यातील फरश बाजार पोलिस स्टेशनला शुक्रवारी पहाटे 5.50 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग लागली होती. घरात जण उपस्थित होते. सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.