Fire Erupt At Kolkata Hospital: कोलकाता (Kolkata) येथील सियालदाह ईएसआय हॉस्पिटल (Sialdah ESI Hospital) मध्ये आज पहाटे 4 च्या सुमारास पहिल्या मजल्यावरील पुरुष शस्त्रक्रिया विभागात (Male Surgery Department) आग (Fire) लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत धुरामुळे कर्करोगाच्या रुग्णाचा गुदमरून मृत्यू झाला. एअर कंडिशनिंग युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी 54 रूग्णांना त्वरीत माणिकटाला ईएसआय रुग्णालयात हलवले.
बाधित भागातील उर्वरित रुग्णांना इतर वॉर्डात हलवण्यात आले असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच इंजिनांच्या सहाय्याने तासाभरात आग विझवण्यात यश मिळविले. (हेही वाचा - Mumbai Fire: घाटकोपर येथील निवासी इमारतीला आग, 13 जण जखमी, रुग्णालायत उपचार सुरु)
कोलकाता रुग्णालयात आग, पहा व्हिडिओ -
STORY | Fire breaks out at #Sealdah ESI Hospital, no report of any injury
READ: https://t.co/yUv61XCWxj
VIDEO: #KolkataNews
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/xf3zTjuvvI
— Press Trust of India (@PTI_News) October 18, 2024
या घटनेचा तपास सुरू असतानाच या केंद्र सरकारच्या रुग्णालयात असलेल्या अग्निसुरक्षेच्या योग्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी अधिकाऱ्यांनी सखोल आढावा घेणे अपेक्षित आहे.