Delhi Election Results 2020 TV9 Live Streaming: 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची निवडणूक (Delhi Assembly Election) पार पडली. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल, आज, 11 फेब्रुवारी रोजी जाहीर होत आहे. 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत, आम आदमी पक्षाने (AAP) 67 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला होता. त्यावेळी भाजपला (BJP) तीन जागा मिळाल्या आणि कॉंग्रेसला (Congress) शून्य जागा मिळाल्या होत्या. आताचे एक्झिट पोल पाहिल्यावर पुन्हा एकदा 'आप'च दिल्लीमध्ये राज्य करेल असे दिसत आहे.
दिल्लीत प्रचारासाठी भाजप, आप आणि कॉंग्रेस अशा तीनही पक्षांनी कोणतीही कमी ठवली नव्हती. भाजपने तर आपल्या 200 खासदारांना 70 विधानसभा जागांवर उभे करून, आपल्या 200 खासदारांवर प्रचाराची जबाबदारी सोपविली होती.
हीच परिस्थिती आपची होती. कॉंग्रेसने मात्र इथे थोडा उशीराच प्रचार सुरु केला. कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनीही प्रचाराला पाठ फिरवली. त्याचाच फायदा आप आणि भाजपला झाला. आता आज या उमेदवारांचे भविष्य निश्चित होणार आहे. या निवडणुकीमुळे अरविंद केजरीवाल, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अवघ्या तासा-दोन तासांत बरेच चित्र स्पष्ट होईल.
सध्या अनेक वृत्तवाहिन्या, बातम्यांचे ऑनलाईन पोर्टल्स या निकालाचे थेट प्रक्षेपण करीत आहे. या निकालाचे अपडेट्स तुम्ही TV 9 वाहिनीवर तसेच त्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाईटवर पाहू शकाल.
टीव्ही 9 वर दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स -
(हेही वाचा: एबीपी न्यूज वर दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा)
दरम्यान, दिल्ली तसे आकारमानाने छोटा प्रदेश आहे, त्यामुळे परिसरातीत शिक्षण, आरोग्य, पाणी-वीज, सुरक्षा, परिवहन, स्वच्छता अशा काही महत्वाच्या जीवनावश्यक गोष्टी यंदाच्या निवडणुकीचा अजेंडा ठरल्या. या सर्व बाबींचा विचार केल्यास आपने दिल्लीकरांसाठी पुरवलेल्या सुविधा वाखाणण्याजोगया आहेत. याचाच फायदा अरविंद केजरीवाल यांना होऊ शकतो. मात्र अक्गेर दिल्लीवर कोणत्या पक्षाचे तख्त बसते ते येणाऱ्या काही तासांत स्पष्ट होईल.