Delhi Assembly Election 2020

Delhi Election Results 2020 ABP Majha Live Streaming: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारी 2020 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाविरुद्ध भारतीय जनता पक्ष, आणि काँग्रेस असा तिरंगा सामना आहे. त्यामुळे आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दिल्लीकरांनी नेमकी कोणत्या पक्षाला साथ दिली हे आज या निकालाच्या माध्यमातून समजणार आहे. तुम्ही दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निकालासंदर्भातील सर्व अपडेट्स डिजिटल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघू शकणार आहात. टीव्ही 9, एबीपी माझा, या अग्रगण्य वृत्तवाहिन्यांवर तज्ञांच्या उपस्थितीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 चे निकाल दाखवले जाणार आहेत.

या वाहिन्यांनी मतदानादिवशी एक्झिट पोलदेखील जाहीर केले होते. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत आज नेमकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तुम्हांला एबीपी माझा वर दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 चे निकाल पाहायचे असतील तर तुम्ही टेलिव्हिजनप्रमाणे युट्युब चॅनलवरही ते पाहू शकता. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

एबीपी न्यूज वरील दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल 2020 चे अपडेट्स येथे पहा

 

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 8 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडली. एबीपी आणि सी व्होटरचा एक्झिट पोलनुसार, यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला 49 ते 63 जागा, भाजपला 5 ते 19 जागा आणि काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळतील. 2015 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.