BJP Kapil Mishra Tweet (Photo Credits: ANI)

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Elections)  8 फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी राजधानी दिल्लीत भाजप (BJP) , आप (AAP) , आणि काँग्रेस (Congress)  कडून जोरदार प्रचार सुरु आहे. अलीकडे प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर अगदी अत्यावश्यक झाला आहे, अनेक राजकीय मंडळी या मार्गाचा वापर करतात. पण काही वेळा भावनेच्या भरात लिहिली जाणारी एखादी पोस्ट कधी आपल्यावरच उलटेल हे सांगणे कठीण आहेे, असेच काहीसे भाजप आमदार कपिल मिश्रा (Kapil Mishra)  यांच्या सोबत देखील घडले आहे. कपिल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून "8 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan)  सामना रंगणार आहे" असे ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी विरोधी पक्षांना पाकिस्तानचा टॅग लावत शाब्दिक खेळ करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र असे करणे आता त्यांना चांगलेच भोवणार असल्याची शक्यता आहे. या ट्विटच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission)  दिल्ली निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण अहवाल मागितला आहे.

निवडणूक आयोगाने दिल्लीआयोगाच्या मुख्याधिकार्यांना 24 तासाच्या आत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, या अहवालानुसार कपिल मिश्रा यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येऊ शकते.तुर्तास निवडणुक आयोग अधिकार्‍यांनी कपिल यांना नोटिस पाठवली आहे. आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

ANI ट्विट

दरम्यान, या एकूणच प्रकरणावर आज कपिल मिश्रा यांनी प्रतिक्रिया देणारे आणखीन एक नवे ट्विट केले आहे. यात त्यांनी खरं बोलायला घाबरणार नाही आणि सत्यावरच असून राहीन अशी भूमिका मांडली आहे. दिल्ली विधानसभेच्या अगदी तोंडावरच कपिल मिश्रा हे अडचणीत सापडणार का हे पाहणे आत महत्वाचे ठरणार आहे.