AAP MLAs Suspension | (Photo Credit- X/ANI)

दिल्ली विधानसभेत आज (25 फेब्रुवारी) अभूतपूर्व (Delhi Assembly Uproar) पाहायला मिळाला. विधासभेचे आठवे अधिवेशन सरु असून दुसऱ्याच दिवशी झालेल्या गोंधळात नवनिर्वाचित सभापती विजेंदर गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. ज्यामध्ये विरोधी पक्षनेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी (Atishi) आणि पक्षाचे वरिष्ठ नेते गोपाल राय (Gopal Rai) यांचाही समावेश आहे. बहुप्रतिक्षित नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अहवाल (CAG Report) सादर होण्यापूर्वी सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला. ज्याचे पर्यावसन आमदार निलंबनात झाले.

आप आमदारांची घोषणाबाजी, उपराज्यपालांच्या भाषणात व्यत्यय

उपराज्यपालांनी आपले भाषण सुरू करताच विधानसभेत गोंधळ उडाला, ज्यामुळे आप आमदारांनी घोषणाबाजी केली आणि कामकाजात व्यत्यय आला. उपराज्यपालांच्या भाषणापूर्वी पक्षाच्या सदस्यांनी 'जय भीम' अशी घोषणाबाजी केली, ज्यामुळे आणखी गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाला उत्तर म्हणून सभापतींनी 12 आमदारांना निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबनानंतर, आमदारांनी विधानसभेबाहेर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर घेऊन आणि राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत निदर्शने केली. (हेही वाचा, Arvind Kejriwal on Delhi Assembly Elections 2025: ‘आम्ही जनादेश स्वीकारला’; विधानसभा निवडणूकीत पराभवावर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रीया (Watch Video))

भाजप सरकार सादर करणार 14 कॅग अहवाल

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकार कॅगचे 14 अहवाल सादर करणार आहे, ज्यात आपच्या कारकिर्दीतील आर्थिक अनियमिततेचा तपशील देण्यात आला आहे. या अहवालांमध्ये मागील प्रशासनाच्या कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनावर प्रकाश टाकण्याची अपेक्षा आहे. भाजप नेत्यांचा दावा आहे की कॅगचा अहवाल आपच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करेल. (हेही वाचा, Mumbai: CAG अहवालात आढळल्या प्रमुख प्रणालीगत समस्या, निधी निष्काळजीपणे वापरल्याचे आले समोर)

भाजप नेत्यांकडून आपवर भ्रष्टाचाराचे आरो

  • भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, कॅगचा अहवाल हा आपच्या काळ्या कृत्यांची यादी आहे. आम्ही दिल्लीतील लोकांना आश्वासन दिले होते की भ्रष्टाचारासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल. आज, जेव्हा अहवाल सादर केला जाईल तेव्हा त्यांचे दुष्कृत्ये उघड केली जातील.
  • दिल्लीचे मंत्री आणि भाजप नेते परवेश वर्मा यांनीही यावर भर दिला आणि दावा केला की, या अहवालातून आपच्या कथित भ्रष्टाचाराची व्याप्ती उघड होईल. दिल्लीतील लोक आणि करदात्यांचा गैरफायदा घेण्यात आला आहे. अहवाल जाहीर झाल्यानंतर मी सर्व तपशील देईन, असे ते म्हणाले.
  • भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी पुढे आरोप केला की अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने भ्रष्टाचाराचे पुरावे लपवण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कॅगचे अहवाल जाणूनबुजून रोखले. हे 14 अहवाल एक-एक करून मांडले जातील. अरविंद केजरीवाल यांना माहित होते की जर हे अहवाल सार्वजनिक केले गेले तर त्यांचे घोटाळे आणि आर्थिक गैरव्यवस्थापन उघड होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, प्रमुख आप नेत्यांचे निलंबन आणि कॅग अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असल्याने, दिल्लीतील राजकीय तणाव वाढत चालला आहे. भाजप आपले निष्कर्ष सादर करण्याची तयारी करत असताना, आप आरोपांना उत्तर देईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे तीव्र राजकीय संघर्षाची सुरुवात होईल, असे मानले जात आहे.