Aadhar Card (Photo Credits-Twitter)

दिल्ली (Delhi) येथून आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर आधार कार्ड लिंक करण्याचे बनावट काम सांगून लोकांकडून तब्बल 10 करोड रुपयांची रक्कम लूटली आहे. तर आरोपींनी लोकांना आधार कार्ड लिंक करण्याच्या नावाखाली गंडवून अगदी चालाखीने बँक खात्यामधून पैशांची लूटमार केली आहे.

आधार लिंक करण्यासाठी आरोपी लोकांकडून फोन क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकसह अन्य माहिती विचारत होते. त्यानंतर लोकांच्या महत्वाच्या बँक खात्यासंबंधित माहिती मिळाल्यास त्यांच्या खात्यामधील रक्कम चोरी केली जात होती. याप्रकरणी पोलिसांना खबर लागताच त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून जवळजवळ 1100 खात्यांमधून पैसे चोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी आधार कार्डच्या नावाखील पैसे उकळण्याचा प्लान अन्य राज्यात सुद्धा केला होता.(दिल्ली: द्वारका मध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यात व्यावसायिकावर अज्ञात इसमांनी केला बेछूट गोळीबार, पाहा अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ)

अलीमुद्दीन अंसारी आणि मनोज याद अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडे विविध बँक खात्याचे 81 डेबिट कार्ड, 104 चेकबुक, 103 पासबुक, 8 फोन, 31 सिम कार्ड आणि आयडी प्रुफ सापडले असून पोलिसांनी त्यांच्याकडून ते जप्त केले आहे. या प्रकरणी अलीमुद्दीन याला विचारले असता त्याने सांगितले की, प्रथम गरिब लोकांना भुलवून त्यांच्या ओळखपत्राचा वापर केला जात होता. त्यानंतर बँक खात्यासंबंधित सुद्धा माहिती घेत ओळखपत्राच्या सहाय्याने पैसे काढले जात होते. खात्यामधून काढलेली रक्कम नंतर स्वत:च्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जात असल्याची कबुली त्याने दिली आहे.