
Akola Shocker: महाराष्ट्रतील अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडला आहे. आरोपाखाली एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. त्यानंतर त्याला अकोला पोलिसांनकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती. कुटुंबियांनी आरोप केला आहे की, पोलिसांच्या मारहाणीत तरुणाने जीव गमावला आहे. त्याच्या गुदद्वारात दांडा टाकून बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- भाईंदरमध्ये इमारतीची भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, अकोट परिसरातील पोलिस ठाण्यात बेदम मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार सुरु केले. तेव्हा समजले की, त्याच्या छातीचे हाडं तुटलं आहे. तो गंभीर अवस्थेत आहे. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी पोलिसांना आणि नातेवाईकांना दिली.
या प्रकरणानंतर मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. गोवर्धन हरमकार अस मृत तरुणाने नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी अकोला पोलिस ठाण्यातील पोलिस महानिरिक्षकांकडे धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी समिती बसली. या प्रकरणात एका पोलिस उपनिरिक्षकांचं आणि एका पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आले आहे.
गोवर्धनला एका आरोपाखाली पकडण्यात आलं होते. पोलिस कर्मचारी आणि PSI राजेश जवर यांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर कारवाई केली होती. गोवर्धनसह त्याचे काका सुखदेव याला देखील ताब्यात घेतलं. १६ जानेवारीला त्याला अमानुष मारहाण केली आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, अकोला पोलिस ठाण्यात गोवर्धन विषयी कुठल्याही प्रकारची गुन्ह्याची नोंद नाही. त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करण गरजेचं होते. त्यामुळे या प्रकरणी दोघांना निलंबित केले आहे.