Dead Lizard Found in School’s Midday Meal प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - ANI)

Dead Lizard Found in School’s Midday Meal in Odisha: ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यातून (Balasore District) अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. सिरापूर (Sirapur) येथील उदयनारायण नोडल शाळेत (Udaynarayan Nodal School) दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात मृत पाल (Dead Lizard) आढळली. त्यामुळे शेकडो विद्यार्थी गुरुवारी दुपारच्या जेवणानंतर आजारी पडले. विद्यार्थ्यांना मळमळ आणि छातीत त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने सोरो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी एका विद्यार्थ्याला त्यांच्या जेवणात भात आणि वरण खाताना एक मृत पाल आढळली. संभाव्य परिणाम टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ताबडतोब खाणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि मळमळ होऊ लागली. मध्यान्य भोजन खाणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सुरुवातीला 24 विद्यार्थी आजारी असल्याची नोंद झाली होती. मात्र, शुक्रवार आजारी विद्यार्थ्यांची संख्या 100 वर पोहोचली. (हेही वाचा -Hyderabad Shocker: किळसवाणा प्रकार! चिकण बिर्याणीत आढळली पाल, व्हिडिओ आला समोर)

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एका वैद्यकीय पथकाने शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांवर उपचार केले. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या आणि त्यांना पुढील उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा -Mumbai News: शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या प्लेटमध्ये आढळली पाल, पोलिस तक्रार दाखल)

दरम्यान, उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे बुधवारी अशाच एका घटनेत एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचा अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी मेहरूना गावातील पंडित दीनदयाळ उपाध्याय आश्रम शाळेत शिक्षण घेत होता. विद्यार्थ्याने शाळेत जेवण केल्यानंतर त्याला पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यासारखी लक्षणे जाणवली.