दार्जिलिंग (Darjeeling ) येथील महिलेस ओलीस (Hostage) ठेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करणाऱ्या चौघांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) गुडगाव (Gurgaon) येथून सोमवारी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेसोबत पाठिमागील तीन महिन्यांपासून हा प्रकार घडत होता. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी झिप्रिन खलको उर्फ अरुण कुमार नावाच्या एकाने तिला चांगल्या कंपनीत नोकरी मिळवून देतो असे सांगून तिला गुडगावला बोलावून घेतले. तेथे तिला नोकरी देण्याचे आमीष दाखवून संभ्रमीत केले आणि ओलीस ठेवले. पुढे तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आला.
पीडितेचा आरोपीसोबत भाड्याच्या खोलीत मुक्काम
पीडितेने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, आरोपीने दाखवलेल्या नोकरीच्या आमिषावर विश्वास ठोऊन पीडिता नोव्हेंबर 2023 मध्ये गुडगावला आली. मात्र, तिच्याकडे राहण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने ती झिप्रिन खलको उर्फ अरुण कुमार याच्यासोबत चक्करपूर येथे भाड्याच्या खोलीत राहिली. सुरुवातीचे काही काळ नोकरी शोधण्याचे काम सुरु आहे. लवकरच नोकरीसाठी कॉल येईल, असे सांगून आरोपी अरुण कुमार वेळ मारुन नेत राहीला. मात्र, थोड्याच दिवसात तो त्याच्या आणखी तीन मित्रांना घेऊन खोलीवर आला. झिप्रिन खलको उर्फ अरुण कुमार अशी या तिघांची नावे आहेत. या सर्वांनी मिळून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केला. (हेही वाचा, Delhi Gang Rape Case: 12 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, आरोपी अल्पवयीन; महिलेसह चार जणांना अटक)
पोलिसांकडून गुन्हा दाखल
आरोपींच्या तावडीतून पळ काढण्यात पीडिता यशस्वी ठरली. त्यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. गुडगाव सेक्टर 2 पोलीस स्टेशनचे प्रभारी निषिकांत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, पीडितेने दिलेली माहिती आणि तक्रारीवरुन आम्ही भारतीय दंड संहिता कलम कलम 6 376 डी (सामूहिक बलात्कार) आणि 2 342 (कोंडून ठेवणे, ओलीस ठेवणे) अन्वये चार आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे. आरोपींचे हे पहिलेच कृत्य आहे की, या आधीही आरोपींनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत हे चौकशीदरम्यान पुढे येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Chitrakoot Rape Case: प्रेमी युगूल दिसले आक्षेपार्ह अवस्थेत, व्हिडिओ काढून मुलीवर सामूहिक बलात्कार, पाच जणांना अटक)
दरम्यान, सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एखाद्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून शहरात बोलावणे आणि तिला ओलीस ठेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणे. तिच्या असहायतेचा फायदा घेणे हा धक्कादायक प्रकार महिलांवरील अत्याचारांवर नव्याने प्रकाश टाकतो आहे. अशा घटनांची पोलिसांनी नोंद घेऊन तातडीने कारवाई करावी आणि आरोपींना अटक करावी, अशी मागणी समाजातून होत आहे.