Dantewada Naxal Attack Spot Visual: दंतेवाडा येथील नक्षलवादी हल्ल्यातील घटनास्थळावरचे फुटेज आले पुढे; पाहा व्हिडिओ
Dantewada Naxal Attack | | (Photo courtesy: Twitter)

छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे माओवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 10 पोलिस कर्मचार्‍यांसह 11 जण ठार झाले. दंतेवाडा माओवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरजवळ जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी हल्ल्यात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता. ज्या भागात स्फोट झाला तो भाग राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे 450 किमी अंतरावर आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण येथे हा व्हिडिओ पाहू शकता.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दंतेवाडा माओवाद्यांच्या हल्ल्यात 10 DRG जवान आणि एक ड्रायव्हर मारल्याबद्दल शोक व्यक्त केला. तसेच नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही असेही ते म्हणाले.

व्हिडिओ

जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे सुरक्षा कर्मचारी माओवाद्यांविरोधात कारवाया करत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या परिसरातून परतत असताना हे जवान माओवाद्यांच्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) हल्ल्याचे लक्ष्य बनले. जवानांचे वाहन परतत असलेल्या मार्गावर नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरली होती.