गुजरातमधील राजकोट शहराच्या सीमेवर बांधण्यात येत असलेल्या चेक डॅमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे. राजकोट-कालावाड मार्गावरील वागुदाद गावाजवळ न्यारी नदीच्या उतारावर 'गिर गंगा परिवार ट्रस्ट'तर्फे १५ लाख रुपये खर्चून चेक डॅम बांधण्यात येत आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप सखिया यांनी सांगितले. स्थानिक आमदार दर्शिता शहा आणि राजकोटचे महापौर प्रदिप दाव यांच्या उपस्थितीत बुधवारी या धरणाचा भूमिपूजन समारंभ पार पडले, असे सांगण्यात आले आहे. तरी "पंतप्रधानांच्या आईला श्रद्धांजली म्हणून आम्ही चेक डॅमचे नाव हिराबा स्मृती सरोवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे कारण हे डॅम हिराबेन मोदी या स्मरणार्थ बांधले जात आहे. हिराबेन मोदींचं नाव दिल जाणार हा बंधारा कायम प्रेरणादायी ठरेल असं दिलीप सखिया म्हणाले.
ट्रस्टने देणगीदारांच्या आर्थिक मदतीतून गेल्या चार महिन्यांत 75 चेक डॅम बांधले असल्याची माहिती मिळत आहे. तरी राजकोट सिमेवर बांधण्यात येत असलेलं हे धरण येत्या दोन आठवड्यांत पूर्ण होईल. तरी ३० डिसेंबर २०२२ रोजी हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर या बांधण्यात येणाऱ्या भव्य दिव्य डॅमचं नाव हिराबेन मोदी देण्याचं ठरलं. या डॅमची सुमारे 2.5 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. असे ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप सखिया यांनी सांगितले आहे. (हे ही वाचा:- Ram Temple in Ayodhya: अयोध्येमध्ये 1 जानेवारी 2024 ला राम मंदिर तयार झालेले दिसेल; Amit Shah यांची माहिती)
हिराबेन मोदी हे धरण 400 फूट लांब आणि 150 फूट रुंद असणार आहे. एकदा भरल्यानंतर ते नऊ महिने कोरडे पडणार नाही. ते भूजल पुनर्भरण करेल आणि जवळपासच्या गावांतील शेतकरी आणि पशुपालकांना मुभलक पाणी मिळण्यास हिराबेन मोदी या धरणाची मोठी मदत होईल.