Dailyhunt’s ‘Trust of the Nation 2024’ Survey: देशभरातून 39% लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल असमाधानी; डेलीहंटचे 'ट्रस्ट ऑफ द नेशन सर्वेक्षण अहवालात खुलासा
PM Modi | Twitter

डेलीहंट, भारतातील अग्रगण्य स्थानिक भाषा सामग्री शोध मंचाने देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे ऑनलाइन सर्वेक्षण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "ट्रस्ट ऑफ द नेशन 2024" सर्वेक्षणाचे (Dailyhunt’s ‘Trust of the Nation 2024’ Survey) परिणाम जाहीर केले. इंग्रजी, हिंदी आणि अनेक प्रादेशिक भाषांसह 11 भाषांमध्ये आयोजित केलेल्या या सर्वेक्षणात 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भारतीयांच्या सार्वजनिक भावनांची झलक पाहायला मिळाली. सर्वे करताना विविध प्रदेशांतील जवळपास 77 लाखांहून अधिक सहभागींना सर्व्हेमध्ये सहभागी करून घेतले गेले. सर्व्हेच्या निकशानुसार देशभरातील एकूण सहभागींपैकी जवळपास 39% जनता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारावर असमाधानी आहे. तर तब्बल 61% जनतेने विद्यमान केंद्र सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

प्रमुख ठळक मुद्दे:

विद्यमान सरकारबद्दल लोकांची धारणा:

प्रशासनाबाबत समाधान: 61% प्रतिसादकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारवर समाधान व्यक्त केले.

आगामी निवडणुकांसाठी अंदाज: उल्लेखनीय म्हणजे, 63% सहभागींना असा विश्वास आहे की आगामी निवडणुकीत भाजपा/एनडीए आघाडी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यकत्त केला.

2024 निवडणूक भावना:

लोकप्रिय नेतृत्व निवड: नरेंद्र मोदी हे पसंतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आम्हाला चालतील असे अनेक लोकांनी म्हटले. देशभरातील सुमारे 64% प्रतिसादकर्त्यांनी मोही हेच पदावर कायम राहण्याचे समर्थन केले.

दरम्यान, कांग्रेस नेते राहुल गांधी यांना 21% लोकांनी पाठिंबा दर्शवला.

प्रादेशिक प्राधान्ये: विविध राज्यांमध्ये मोदींना पाठिंबा मिळाला, विशेषत: उत्तर प्रदेश (78.2%), पश्चिम बंगाल (62.6%), तेलंगणा (60.1%), आणि आंध्र प्रदेश (71.8%) या राज्यांतील लोकांनी आम्हाला मोदी पंतप्रधान असलेले चालती असे म्हटले.

शासन आणि आर्थिक प्रगती:

आर्थिक व्यवस्थापनाला मान्यता: निम्म्याहून अधिक प्रतिसादकांनी (53.3%) मोदींचे आर्थिक व्यवस्थापन 'खूप चांगले' असे म्हटले.

प्रगतीबाबत समाधान: दहापैकी सहा प्रतिसादकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत 'अत्यंत आनंदी' असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

परराष्ट्र धोरण:

सकारात्मक मूल्यांकन: जवळजवळ दोन तृतीयांश प्रतिसादकर्त्यांनी (64%) पंतप्रधान मोदींच्या सरकारच्या परराष्ट्र व्यवहाराला 'खूप चांगले' असे रेट केले.

सर्व्हेची कार्यपद्धती:

सर्वसमावेशक सर्वेक्षण: डेलीहंट द्वारे आयोजित, सर्वेक्षणामध्ये वयोगट, लिंग आणि व्यवसायांसह लोकसंख्याशास्त्रातील 77 लाखांहून अधिक सहभागींच्या विविध नमुन्यांचा समावेश आहे.

प्रश्नावली उपलब्धता: व्यापक सहभाग सुनिश्चित करून प्रश्नावली 11 भाषांमध्ये उपलब्ध होती.

मूल्यांकन क्षेत्रे: आर्थिक व्यवस्थापन, परराष्ट्र धोरण, संकट हाताळणी आणि कल्याणकारी उपक्रमांसह विविध क्षेत्रांमधील सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांच्या धारणा मोजण्यासाठी सर्वेक्षण प्रश्नांची रचना करण्यात आली होती.