दादरा नगर हवेलीचे (Dadra and Nagar Haveli) खासदार दिवंगत मोहन डेलकर (Mohanbhai Delkar) यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांच्यासह कुटुंबीयांच्या हाती शिवबंधन येणार आहे. कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) आणि अभिनव डेलकर (Abhinav Delkar) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. मोहन डेलकर यांनी मुंबई येथे एका हॉलेटलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये स्थानिक भाजप आमदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव होते. डेलकर यांच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली होती. ते अपक्ष खासदार होते.
मोहन डेलकर यांनी दादरा व नगरहवेली लोकसभा मतदारसंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये दक्षिण मुंबई येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. डेलकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, डेलकर कुटुंबीय शिवसेना पक्ष प्रवेश करत आहेत. शिवसेनेकडून डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. (हेही वाचा, MP Mohan Delkar Suicide Case चा तपास SIT मार्फत होणार: गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)
मोहन डेलकर हे दादरा व नगर हवेली येथील मोठे राजकीय नेते होते. 1989 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडूण येत होते. डेलकर यांनी काँग्रे, भाजप, भारतीय नवशक्ती पक्ष अशा विविध पक्षांच्या तिकीटांवर वेगवेगळ्या वेळी निवडणुका लढवल्या होत्या. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि निवडूणही आले. विशेष म्हणजे मोहन डेलकर हे दादरा व नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील एकमेव खासदार होते. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा तपास महाराष्ट्र पोलीस करत आहेत.