रेल्वे बोर्डाकडून त्याच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ (DA Hike) करण्यात आली आहे. 42%वरून त्यांचा महागाई भत्ता 46% करण्यात आला आहे. ही वाढ 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आली आहे. याबाबतचं परिपत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे. महागाई भत्ता हा पगारात बेसिकच्या 46% दिला जाईल. दिवाळी पूर्वी ही घोषणा झाल्याने कर्मचार्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे 15,000 कोटी रुपयांच्या बोनसला मंजुरी दिल्यानंतर पाच दिवसांनी बोर्डाची घोषणा आली आहे, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीएमध्ये 4 टक्के वाढ समाविष्ट आहे.
"कर्मचार्यांना जुलैपासून डीए देणे बाकी होते त्यामुळे ते मिळणे कर्मचार्यांचा अधिकार आहे. ही महागाई भत्त्यामधील वाढ, दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो," असे ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी PTI शी बोलताना सांगितले आहे. दरम्यान M Raghavaiah, General Secretary of the National Federation of Indian Railwaymen यांनी रेल्वे बोर्डाने वेळेवर म्हणजे दिवाळीपूर्वी डीए मध्ये वाढ जाहीर केल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे पण यासोबत कर्मचार्यांचा कोविडच्या काळात जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचा गोठवलेला डीए देखील आता देण्याची मागणी आपण धरून ठेवत असल्याचं म्हटलं आहे. 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्त्याच्या थकबाकीलाही मिळणार मंजुरी, कधी येणार पैसे? जाणून घ्या .
Consumer Price Index वर डीए मधील वाढ अवलंबून असते आणि त्याचा उद्देश महागाई न्युट्रिलाईज करणं हा असतो. दरवर्षी सरकारी कर्मचार्यांना जानेवारी आणि जुलै अशा दोन महिन्यात महागाई भत्त्यातील वाढ दिली जाते.