बुलबुल चक्रीवादळ प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: File Photo)

Cyclone Yaas Update:  देशाच्या पूर्व किनारपट्टी क्षेत्रात यास चक्रीवादळ घोंघावत आहे. बंगालच्या घाडीत निर्माण झालेल्या यास चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. खरंतर या आठवड्याच्या सुरुवातीलाच देशातील पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर भारतीय नौसेनेकडून मोठे बचाव आणि मदत कार्य पार पाडले. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक आणि गोवा मध्ये मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. आयएमडीकडून शनिवारी असे सांगण्यात आले आहे की, यास चक्रीवादळ रौद्र रुप धारण करत येत्या 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे.

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता NDMA च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत पीएम मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यतिरिक्त अन्य मंत्री सुद्धा सहभागी होणार होते. या बैठकीत मोदी चक्रीवादळ याससंदर्भात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा आढावा घेणार आहे.(Cyclone Yaas: चक्रीवादळ 'यास' च्या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौसेनेचे जहाज आणि विमान अलर्ट)

Tweet:

आयएमडीनुसार, 26 मे रोजी संध्याकाळी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल. ओडिशा आणि आजूबाजूच्या देशातील किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल. उत्तर ओडिशा आणि बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर 26 मे रोजी सकाळी वाऱ्याचा वेग 110 किमी प्रति तास राहणार आहे. संध्याकाळ पर्यंत हा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने असे म्हटले आहे की, उत्तर-उत्तर पश्चिमच्या दिशेने ते पुढे सरकरणार असून रौद्र रुप धारण करणार आहे. 26 मे रोजी सकाळी पश्चिम बंगालच्या जवळ बंगालच्या उत्तर खाडी आणि उत्तर ओडिशासह बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.(Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या Barge P305 चा शोध अखेर लागला; मृतांचा आकडा 66 वर)

तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर बंगालच्या खाडीच्या दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य, अंदमान सागर आणि अंदमान-निकोबार द्वीप समूहांच्या दिशेने 22 ते 24 मे दरम्यान जाऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त 23 ते 25 मे मध्ये बंगालच्या मध्य खाडीत आणि 24 ते 26 मे दरम्यान पश्चिम बंगालसह ओडिशा आणि बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परतावे असे सांगण्यात आले आहे.