Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

बंगालच्या खाडीमध्ये आज यास चक्रीवादळ घोंघावत आहे. कोलकाता, ओडीसा मध्ये धुव्वाधार पाऊस बरसत असल्याने या भागात जाणार्‍या विमान सेवेवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. आज मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA)वरील 6 फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई- भुवनेश्वर, मुंबई - कोलकाता विमानांचा समावेश आहे. दरम्यान Mumbai Airport PRO ने दिलेल्या माहितीनुसार, CSMIA वरून आज उर्वरित सारी इतर सेक्टर वरील विमानं वेळापत्रकानुसार चालवली जाणार आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज यास चक्रीवादळ ओडिशा मधील बालासोर आणि धामरा दरम्यान लॅन्डफॉल करणार आहे. यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत चक्रीवादळाचा एंड टेल देखील संपलेला असेल. सध्या पूर्व तटावर एनडीआरएफ च्या टीम्स तैनात आहेत. ओडिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये 113 एनडीआरएफ टीम्स काम करत आहेत. त्यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे. तर अंदाजे 14 लाख लोकांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. Cyclone Yaas: ओडिशा राज्याच्या भद्रक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरुवात.

ANI Tweet

काही दिवसांपूर्वी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला देखील तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यावेळेस देखील विमानसेवा काही तासांसाठी स्थगित करण्यात आली होती. सध्या पश्चिम बंगाल, ओडिसा मध्ये तुफान पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. हवामान खात्याच्या अंंदाजानुसार उद्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ झारखंड मध्ये पोहचणार आहे. त्यामुळे नोर्थ ओडिसा आणि ओडिसाच्या किनारी भागात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आज हवामान खात्याने वर्तवला आहे.