Cyclone फनी: ओडिशातील मृतांचा आकडा 64 वर पोहोचला, नुकसानाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय दल पोहोचले घटनास्थळी
Fani dead people update (Photo Credits: PTI)

Cyclone Fani: काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये (Odisha) झंझावती फनी चक्रीवादळाने ह्या राज्याचे अतोनात नुकसान केले असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. ह्या चक्रीवादळाने आतापर्यंत 64 लोकांचा बळी घेतला आहे. 3 मे ला 240 किमी प्रति तासाच्या वेगाने वादळीवा-यासह आलेल्या ह्या फनी वादळामध्ये 241 लोक जखमी झाले आहेत. ह्यात पूरी (Puri) मध्ये 39, केंद्रपाडामध्ये 3, मयूरभंजमध्ये 4, जाजपूरमध्ये 3, कटकमध्ये 6 आणि खोरधामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. ह्यासंदर्भात घटनास्थळीचा आढावा घेण्यासाठी सदस्यीय केंद्रीय दल भुवनेश्वरमध्ये (Bhuvaneshwar) गेले आहेत.

Cyclone Fani Update:

 

 

गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विवेक भारद्वाज यांची टीम आजपासून बाधित घटनास्थळाचा आढावा घेण्यास सुरुवात करतील. त्याआधी त्यांना विशेष मदत आयुक्त बी.पी. सेठी ह्यासंबंधी अधिक माहिती देतील.

Cyclone Fani In Bangladesh: बांग्लादेश मध्ये फनीचा हाहाकार, 9 जणांचा घेतला बळी, 60 जण जखमी

तर दुसरीकडे वनअधिका-यांनी सांगितले की, 3 मे फनी वादळ पूरी शहरात आले होते. मात्र 4 मे ला 10 फूट उंच उडणा-या समुद्राच्या लाटांनी सर्वकाही नष्ट करुन टाकले. त्याचा समुद्राजवळ असलेल्या 4 गेस्ट हाऊसला फटका बसला. त्याचबरोबर इको टूरिझम कॉम्प्लेक्सला सुद्धा ह्या फनी वादळाचा मोठा फटका बसला.