Cyclone Fani In Bangladesh: बांग्लादेश मध्ये फनीचा हाहाकार, 9 जणांचा घेतला बळी, 60 जण जखमी
फनीमुळे माजलेला हाहाकार (Photo Credits-PTI)

ढाका: भारतातील ओडिशा (Odisha) व पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात हाहाकार माजवून फनी वादळाने (Cyclone Fani) काल बांग्लादेशकडे (Bangladesh)  कूच केली होती. प्रतितास 200 किमी वेगाने धावणाऱ्या या वादळाने आतापर्यंत दक्षिण व पश्चिम भारतात अनेक बळी घेतले असून आता बांग्लादेश मध्येही मृतांचा आकडा 9 पर्यंत पोहचल्याचे समोर येत आहे. बीडीन्यूज 24च्या माहितीनुसार बांग्लादेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री एनामूर रेहमान (Enamoor Rehman)  यांनी मृतांविषयी माहिती देताना आता पर्यंत साधारण 60 जण जखमी झाले असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम बंगाल मधून शनिवारी सकाळी बांग्लादेशात प्रवेश करताना फनीचा वेग तसा कमी झाला होता, मात्र तरी ही किनाऱ्या जवळच्या गावांना व प्रदेशांना याचा जोर जाणवत होता. या वादळाचा वेग इतका तीव्र होता की ज्यामुळे आसपासच्या विभागातील झाडे उखडली जाऊन लगबग 2000 घर उध्वस्त झाली. तरीही अजून पर्यंत सरकारने एकूण झालेल्या नुकसानाचा कोणताही अंदाज वर्तवला नसून हा आकडा वाढण्याची शक्यता दर्शवली जातेय. फनी वादळात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु, NEET ची परीक्षा ढकलली पुढे

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किनाऱ्या जवळ राहणाऱ्या 16 लाख लोकांना वादळापुर्वीच 4000 सुरक्षा केंद्रांमध्ये हलवण्यात आलं होतं शनिवारी वादळाचा वेग कमी झाल्यावरच ही लोकं आपआपल्या घरी परतली, तर बांग्लादेश मध्ये देखील खबरदारी म्हणून तीन दिवसाचा बंद ठेवण्यात आला होता, त्यानंतर आज, रविवारी सकाळी बोटींची सेवा सुरु करण्यात आली. बांग्लादेश हवामान विभागाच्या माहितीनुसार अजूनही देशातील काही राज्यांमध्ये काळे ढग पाहायला मिळत असून विजांचा कडकडाट व जोराच्या वाऱ्यासह पाऊस सुरु आहे.