Cyclone (Photo Credits: Pixabay)

चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) पुढच्या काही तासांमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 48 तास महत्त्वाचे आहे. या काळात बिपरजॉय चक्रीवादळ उत्तर-पश्चिम भारताकडे सरकणार( Cyclone Biparjoy Will Move Towards Northwest India) आहे. हवामान विभागाने गुरुवारी पहाटे केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पूर्व मध्य अरबी समुद्रावर अतिशय तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय 07 जून 2023 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार 2330 तासांवर समुद्राच्या मध्यभागी 13.6N आणि लांब 66.0E, गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस, मुंबईच्या 930km SWm दिशेने आणखी तीव्र होईल. हे सर्व पुढच्या 48 तासांमध्ये घडू शकेल. तसेच, पुढच्या 3 दिवसांमध्ये हे वादळ उत्तर-वायव्य दिशेने सरकेल.

दरम्यान, हे वृत्त लिहिण्यापूर्वी काही तास आगोदर चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या पोरबंदरच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 1,060 किमी अंतरावर होते. दरम्यान, गुजरात सरकारने संभाव्य नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. गुजरातमधील मच्छिमारांना 14 जूनपर्यंत अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात भागात 9 ते 11 जूनपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. (हेही वाचा, Cyclone Biparjoy Dates in Mumbai & Konkan: मुंबई आणि कोकणात चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तर राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, IMD चा इशारा)

ट्विट

दरम्यान, मान्सूनचे आगमन होण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढच्या एकदोन दिवसांमध्ये मानसूनमध्ये दाखल होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाल्यास पुढे मुंबई आणि दक्षिणेकडील राज्यांमध्येही विलंबानेच दाखल होतो.