Cyclone Biparjoy Dates in Mumbai & Konkan: राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. 7 जूनपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. यामुळे चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता असून या चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) असे नाव देण्यात आले आहे. हवामान एजन्सीने आपल्या हवामान अंदाजात म्हटले आहे की, दक्षिणपूर्व अरबी समुद्रात 5 जून ते 7 जूनपर्यंत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पुढील 48 तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि कोकण प्रदेशासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) आणि अचानक पूर (Floods) येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, जर कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती चक्रीवादळात झाली तर त्याला ‘सायक्लोन बिपरजॉय’ म्हटले जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Weather Forecast: राज्यात तापमान वाढले, अनेक ठिकाणी उनपावसाची पाठशिवणी, जाणून घ्या हवामान अंदाज)
एप्रिल महिन्यात, IMD ने उत्तर हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावरील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नावांची तपशीलवार यादी जारी केली. भारतासाठी चक्रीवादळांच्या नावांमध्ये गती, तेज, मुरासू, आग, व्योम, झार, नीर आणि घुरनी यांचा समावेश होता, तर चक्रीवादळ बिपरजॉयला त्याचे नाव बांगलादेशासाठी मिळाले आणि त्यात निसर्ग, अर्णब आणि उपकुल सारख्या काही इतर नावांचा समावेश आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊसासह पूराची शक्यता -
अहवालानुसार, जर कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात विकसित झाले तर ते अतिवृष्टीला चालना देऊ शकते. यामुळे महाराष्ट्रात अचानक पूर येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ बिपरजॉयच्या तात्पुरत्या तारखा सूचित करतात की चक्रीवादळ परिचलनामुळे पुण्यासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो.
याशिवाय, मुंबईत 8 ते 10 जून दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकण भागात 11 ते 12 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. चक्रीवादळामुळे कोकणात अचानक पूर येण्याची शक्यता आहे.