COVID19 Vaccine: खासगी रुग्णालये आणि क्लिनिकमध्ये कोरोनाच्या लसीसाठी नागरिकांना 250 रुपये शुल्क मोजावे लागणार
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

COVID19 Vaccine: खासगी रुग्णालये आणि क्लिनिक सेंटर्मध्ये कोरोना व्हायरसवरील लस घ्यायची असल्यास नागरिकांना त्यासाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालय किंवा लसीकरण केंद्रात एका लसीची किंमत 250 रुपये ठरवली आहे. तर सर्व शासकीय रुग्णालये आणि केंद्रात हिच लस फ्री दिली जाणार आहे. देशात सध्या 10 हजारांहून अधिक खासगी रुग्णालय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन औषधी योजनेअंतर्गत पॅनलमध्ये आहे. तर 687 खासगी रुग्णालये सीजीएचएसच्या पॅनलमध्ये आहे. या सर्व ठिकाणी लसीकरण केले जाऊ शकते.

खासगी रुग्णालयाची लिस्ट आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त सरकारी मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय. सब डिव्हिजनल हॉस्पिटल, CHC, PHC मध्ये सर्वांना लस दिली जाणार आहे. तर 45-59 वर्ष जुन्या गंभीर आजार असणाऱ्या लोकांना रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कडून एक फॉर्म साइन करुन घ्यावा लागणार आहे.(Coronavirus: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सुचना, राज्यांनुसार जाणून घ्या काय असणार नियम)

Tweet:

आतापर्यंत लसीकरण फक्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी केले जात होते. त्यानंतर आता एक मार्च पासून सामान्य नागरिकांना सुद्धा लसीकरण दिले जाणार आहे. तर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लसीकरणासाठी खासगी क्षेत्राची भागीदारी वाढवली जात आहे. आयुष्यमान भारत पीएमजेएवाय अंतर्गत जवळजवळ 10 हजार रुग्णालय आणि सीजीएचएस अंतर्गत 687 रुग्णालयांचा लसीकरणासाठी वापर केला जाऊ शकतो.