Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

COVID19 Vaccination For Teenagers:  देशभरात 15-18 वयोगटातील मुलांच्या कोविड19 वरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला असून रात्री 11 वाजेपर्यंत जवळजवळ 41.3 लाख मुलांना लसीचा डोस दिला गेला आहे. तर दररोजचा लसीकरणाचा आकडा हा 98.6 लाखापर्यंत पोहचत असल्याची माहिती दिली गेली आहे.(देशात आली आहे Covid-19 ची तिसरी लाट; मेट्रो शहरांमध्ये Omicron ची 75 टक्के प्रकरणे- कोविड टास्क फोर्स प्रमुख)

लसीकरणासाठी रात्री 10 वाजेपर्यंत 42 टक्के जणांनी डोस घेतले. त्यामध्ये सर्वाधिक लसीकरण हे मध्य प्रदेश (7.7 लाख), गुजरात (5.6 लाख), आंध्र प्रदेश (4.9 लाख), कर्नाटक (4.1 लाख) आणि राजस्थान (3.6 लाख). परंतु उत्तर प्रदेशात फक्त 1.7 लाख डोस दिले गेले. त्याचसोबत केंद्र सरकारने जवळ येत असलेल्या निवडणूका लक्षात घेता प्रौढ नागरिकांना सुद्धा लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

यादरम्यान, बिहार येथे 1.7 लाख लहान मुलांचे लसीकरण, महाराष्ट्र (1.8 लाख), तमिळनाडू (1.9 लाख) आणि पश्चिम बंगाल मध्ये मात्र 1 लाख लसीकरण पहिल्या दिवशी झाले. तर दिल्लीत 21,010 लहान मुलांना लसीचा डोस दिला गेला. 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन 1 जानेवारी पासून सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार रविवार पर्यंत 8 लाख जणांचे रजिस्ट्रेशन झाले.(COVID-19 Vaccination For Teenagers: 15-18 वर्षीय मुलांसाठी आजपासून कोविड 19 चे लसीकरण; पहा Co-WIN वर स्लॉट कसा कराल बूक?)

ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्यतिरिक्त नजीकच्या लसीकरण केंद्रावर वॉक-इन पद्धतीने सुद्धा लसीकरणाची नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या वयोगटाली मुलांची संख्या 7.4 कोटी असल्याचा अंदाज आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे. सध्या मुलांना कोवॅक्सिन लसीचा डोस दिला जात आहे. तर भारतात आतापर्यंत 146 कोटी नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे. तर 90 टक्क्यांहून अधिक प्रौढांनी लसीचा पहिला डोस आणि 65 टक्के जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे.