ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस येऊ शकते COVID19 ची तिसरी लाट, ICMR चा इशारा
Coronavirus (Photo Credits-Twitter)

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोवर आता तिसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉडी अॅन्ड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. एका न्यूज चॅनल सोबत बोलताना समीरन पांडा यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक भयंकर नसणार आहे. पण तिसऱ्या लाटेच्या विळख्यात देश लवकरच अडकला जाईल.

पांडा यांनी पुढे असे म्हटले की, कोरोनाच्या विरोधात लढताना लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेत सुद्धा हेच कारण अत्यंत भयावह ठरु शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना लगेच कोरोनाची लागण होऊ शकते. त्यांनी असा ही दावा केला आहे की. कोरोनाच्या विरोधात लढा दिल्यानंतर पुन्हा मिळवलेली रोगप्रतिकारक शक्ती नव्या वेरियंटमुळे ही कमी होऊ शकते. असे झाल्यास संक्रमणाचा अधिक फैलाव होऊ शकतो.(COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 38,949 रूग्णांना कोरोनाचे निदान; 542 मृत्यू)

समीरन पांडा यांनी पुढे असे ही म्हटले की, अशी अपेक्षा आहे डेल्टा आणि डेल्टा प्लस वेरियंट हा मानवी जीवनावर अधिक प्रभाव टाकू शकतो. खरंतर त्यांना विचारण्यात आले होते की, डेल्टा प्लस वेरियंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते का? पांडा यांचे हे विधान अशावेळी समोर आले आहे जेव्हा नुकत्याच एम्स रुग्णालयाचे निर्देशक डॉक्टर रणदीप गुलेरियांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल म्हटले होते. गुलेरिया यांनी असे म्हटले होते की, कोरोनाची तिसरी लाट नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे येऊ शकते. कोरोना संक्रमणाचे नवे वेरियंट समोर येत आहेत. पण सरकारकडून लॉकडाउन आणि अन्य निर्बंधात सूट दिली जात आहे.  अशातच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो.