Congress | (File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज म्हणजेच शुक्रवारी राष्ट्राला संबोधित केले. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीकरणाबाबत (Coronavirus Vaccination) भारताच्या यशाबद्दल माहिती दिली. आता या भाषणानंतर काँग्रेसने (Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. सोबतच पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या निवेदनानंतर पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

वल्लभ यांनी विचारले की, जेव्हा देशाच्या 50 टक्के लोकसंख्येला कोविडची एकही लस मिळाली नाही आणि सरकारच्या अक्षमतेमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला, तेव्हा नेमका कोणता उत्सव साजरा करण्यात येत आहे? काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले की, पंतप्रधानांनी अशी काही तथ्ये मांडली होती जी अर्धी अपूर्ण आणि चुकीचीही होती. यामुळे वैज्ञानिक समुदायात गोंधळ होऊ शकतो. पंतप्रधान 'संपूर्ण राज्यशास्त्र', 'इव्हेंटॉलॉजी' आणि 'वस्त्रशास्त्र' विषयी बोलू शकतात. पण त्यांनी आरोग्य आणि साथीसारख्या संवेदनशील विषयांवर चुकीची माहिती देऊ नये.

त्यांनी दावा केला की, पंतप्रधान म्हणाले की, देशात पहिल्यांदा लस तयार करण्यात आली आहे. मला वाटते की हा भारताच्या शास्त्रज्ञ, औषध उद्योग, डॉक्टर, परिचारिका, कोरोना योद्ध्यांचा अपमान आहे. सत्य हे आहे की भारत आधीच लसींच्या उत्पादनासाठी एक प्रमुख केंद्र आहे.

टीबीवर नियंत्रण ठेवण्याचा कार्यक्रम 1960 मध्ये भारतात सुरू करण्यात आल्याचे काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितले. 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकाच वेळी सहा रोगांचे लसीकरण सुरू केले, पण त्यांचा फोटो कुठेही लावून जाहिरात केली नाही. 2011 मध्ये लसीकरण धोरण तयार करण्यात आले. वल्लभ म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की भारत जगातील पहिला देश बनला आहे जिथे लसींचे 100 कोटी डोस देण्यात आले आहेत. परंतु 16 सप्टेंबर 2021 पर्यंत चीनमध्ये 200 दशलक्षाहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

गौरव म्हणाले की सरकारच्या अक्षमतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लाखो कुटुंबांसाठी हा उत्सव साजरा करण्याची वेळ आहे का? मला वाटते की पंतप्रधानांनी या कुटुंबांची माफी मागावी. लसीकरणाचा असा उत्सव साजरा करण्याची वेळ नाही. त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल क्षमा मागतो. (हेही वाचा:  'युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नका'; 100 कोटी लसींचा टप्पा पार झाला तरीही कोविड नियमावली पाळण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन)

गौरव वल्लभ असेही म्हणाले की, 'या देशात काहीही मोफत नाही. हा करदात्यांचा पैसा आहे. करदात्यांचे पैसे फक्त करदात्यांवरच खर्च केले जात आहेत. म्हणूनच लस विनामूल्य नाही. जेव्हा भाजपने स्वतःच्या पैशातून मोफत लसीकरण मोहीम चालवली असती तर ते मोफत लसीकरण ठरले असते.’