COVID-19 Vaccination Drive in India Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमचा शुभारंभ; येथे पहा लाईव्ह
COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

बहुप्रतिक्षित अशी कोविड-19 लसीकरण मोहिम (COVID-19 Vaccination Drive) आजपासून (16 जानेवारी) सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज सकाळी 10.30 मिनिटांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. भारतात होणारे लसीकरण ही जगातील सर्वात मोठी मोहिम असून यात संपूर्ण देश व्यापला जाणार आहे. या मोहिनेचा शुभारंभ तुम्ही DD news आणि DD news च्या युट्युब चॅनलवर पाहू शकता.

लसीकरण मोहिम ही प्राधान्यक्रमावर अवलंबून आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य सेवक, ICDS वर्कर्स यांचा समावेश करण्यात आला आहे. लसीकरणासाठी देशभरात तब्बल 3006 केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येईल. (COVID-19 Vaccination in India: देशात उद्यापासून सुरु होणार कोविड-19 लसीकरण; जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या मोहिमेबाबत काही महत्त्वाच्या बाबी)

येथे पहा लसीकरण मोहिमेचे लाईव्ह:

देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे पुरेस डोस पुरवण्यात आले आहेत. 6-8 महिन्यांच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 30 कोटी लोकांना लस देण्याची सरकारची योजना आहे. कोविड-19 लस ही 1 कोटी आरोग्यसेवक, 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्सस अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि 27 कोटी ज्येष्ठ नागरिकांना विशेषत: 50 वर्षांवरील व्यक्तींना देण्यात येणार आहे. (Corona Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून कोरोना लसीकरण प्रारंभ, 285 केंद्रांवर यंत्रणा सज्ज)

आरोग्य मंत्रालयाने विकसित केलेल्या Co-WIN अॅप लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे. याअॅपद्वारे लसीचा साठा, स्टोरेज टेम्परेचर, लसीचे लाभार्थी यांची माहिती ठेवणे सोपे होणार आहे.