Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना रुग्णांमध्ये वाढ (Covid-19 in India) होताना दिसत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. देशात गेल्या 24 तासांत 600 हून अधिक कोरोना (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे. ही नवीन आकडेवारी फार चिंताजनक आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे टेन्शन वाढलं आहे. देशात कोरोना व्हायरसचे (Corona Virus) 628 नवीन रुग्ण सापडले आहेत. यातील बहुतेक रुग्ण नव्या JN.1 सब-व्हेरियंटचे असल्याचं समोर आलं आहे. यामुळे सक्रिय कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4054 झाली आहे, या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. (हेही वाचा - Karnataka Issues Covid Guidelines: JN.1 ची वाढती रुग्ण संख्या लक्ष्यात घेता कर्नाटक सरकारने कोविड मार्गदर्शक तत्त्वे केले जारी)

कर्नाटकातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे सरकारची चिंता आणखी वाढली आहे. कर्नाटकात गेल्या 24 तासांत देशात 74 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यासोबतच दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील सक्रिय रुग्णांची संख्या 464 झाली असून मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे.

सध्या पार्ट्या आणि गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यासोबतच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे.