राज्यात JN.1 कोरोना व्हायरस (Corona Virus) प्रकाराच्या संसर्गाच्या वाढीच्या दरम्यान, कर्नाटक (Karnataka) सरकारच्या कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक निर्देश तत्वे जारी केले आहे. सावधगिरीच्या उपायांमध्ये कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याचा समावेष आहे. सावधगिरीच्या उपायांमध्ये कोविड-योग्य वर्तनाचे पालन करणे समाविष्ट आहे, जसे की सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, संक्रमित व्यक्तींसाठी सात दिवसांचे होम आयसोलेशन आणि लक्षणे असलेल्या मुलांना शाळेत पाठवण्यापासून परावृत्त करणे. इत्यादीचा समावेश आहे. मंगळवारी आढावा बैठक घेणार्या सरकारी उपसमितीने वयोवृद्ध आणि कॉमोरबिडीटी असलेल्यांना 'लस' घेण्याचा सल्ला दिला. हे सुलभ करण्यासाठी, सरकारने केंद्राकडून Corbevax लसीचे 30,000 डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा - New Task Force in Maharashtra: कोरोना विषाणूच्या JN.1 या प्रकाराच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्र सरकारकडून नवीन टास्क फोर्सची स्थापना)
राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, सरकार नवीन वर्षाचे उत्सव आणि मेळावे यावर कोणतेही निर्बंध लादत नाही. यासंदर्भात सरकार सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. "मार्गदर्शक तत्त्वे अशी आहेत- प्रत्येकाला मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे, विशेषत: 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि ज्यांना कॉमोरबिडीटी आहे त्यांना अनिवार्यपणे. लहान मुले, ज्यांना सर्दी, ताप यासारखी लक्षणे आहेत त्यांना शाळेत पाठवू नये, आवश्यक असल्यास चाचणी देखील केली जावे” असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.