Coronavirus: गोवा येथे कोरोना व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण तर 3 जणांना संसर्ग
Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहचली आहे. तर आता गोव्यात (Goa)  सुद्धा कोरोना व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. तसेच अन्य 3 जणांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.गोव्यात आढळून आलेल्या कोरोनाच्या संशियत रुग्णांची माहिती देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले तिघे हे पुरुष मंडळी आहेत. त्यामधील तीन जण हे 25 वर्ष, 29 वर्ष आणि 55 वर्षीय असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व जणांनी स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि युएस येथून प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या तीन जणांची प्रकृती ठिक असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत की, घरातील वातानुकुलीत यंत्रणा (एसी) नागरिकांनी बंद ठेवावी. घरातील थंड वातावरणाचा फायदा घेऊन विषाणू अधिक काळ टिकून राहू शकतात. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी शक्यतो एसी बंद ठेवा. यासोबतच कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. जिवानावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार आहेत.(केरळमध्ये Coronavirus रुग्णावर Anti-HIV औषधे वापरून यशस्वी उपचार; रुग्णाची कोरना विषाणू चाचणी निगेटिव्ह)

तर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतातील सर्व टोल प्लाझावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले आहे. सध्या देशातील कोरोना विषाणू परिस्थितीचा विचार करता हा निणर्य घेतला गेला आहे.टोल वसुली बंद झाली असली तरी, रस्त्यांचे दुरुस्तीचे काम तसेच चालू राहील. टोल नाक्यांवरील सर्व सेवा यादरम्यान सुरू राहतील, ही टोल वसुली काही काळाकरीता थांबवण्यात आली आहे, असेही नितीन गडकरींनी स्पष्ट केले आहे.