भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाचा एक मोठा टप्पा पार केल्यानंतर आता Precaution Dose साठी देखील जागृती केली जात आहे. भारत सरकारने आज या बुस्टर डोस बाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. भारतात 18 वर्षांवरील Covishield किंवा Covaxin घेतलेल्या नागरिकांना आता बुस्टर डोस साठी Biological E च्या Corbevax या लसीचा डोस देखील घेण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे. देशात पहिल्यांदाचा दोन वेगवेगळ्या लसी घेण्यास नागरिकांना सरकार कडून परवानगी देण्यात आली आहे.
National Technical Advisory Group on Immunisation कडून परवानगी मिळाल्यानंतर या मिक्स्ड डोस साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनच्या कोविड 19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी किंवा 26 आठवड्यानंतर कोर्बेवॅक्सचा बुस्टर डोस घेतला जाऊ शकतो.
ANI Tweet
Biological E's Corbevax booster shot for Covaxin and Covishield beneficiaries above 18 years of age approved by Government of India: Official sources pic.twitter.com/HWlt90iEAC
— ANI (@ANI) August 10, 2022
सूत्रांच्या माहितीनुसार, Co-WIN portalवर आता Corbevax vaccine चा बुस्टर घेण्यासाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत. The Drugs Controller General of India कडून 4 जूनला Corbevax च्या बुस्टर डोसला 18 वर्षांवरील नागरिकांसाठी परवानगी देण्यात आली आहे.
Corbevax ही भारतामधील पहिली RBD protein subunit vaccine आहे. सध्या ही लस 12-14 वयोगटातील मुलांना दिली जात आहे. COVID-19 Working Group कडून 20 जुलैला झालेल्या त्यांच्या बैठकीत या लसी बाबतच्या क्लिनिकल अहवालाचा आढावा घेतला होता.
भारतामध्ये 10 जानेवारी 2022 पासून नागरिकांना बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. आझादी का अमृत महोत्सव मध्ये देशात सध्या सरकारी हॉस्पिटल मध्ये मोफत बुस्टर डोस उपलब्ध करून दिला जात आहे.