Coronavirus: हिमाचल प्रदेशात कोरोना व्हायरसमुळे महिलेचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

देशभरात कोरोना व्हायरने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांसह मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच देशभरात लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढायचे असेल तर घरीच थांबा असे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजराच्या पार तर मृतांची संख्या 56 वर पोहचली आहे. तर आता हिमाचल प्रदेशात एका महिलेचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी उपचार करत आहेत. तसेच कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसले तरीही डॉक्टरांकडून रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तर हिमाचल प्रदेशात एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी गुजरात मधील वडोदरा येथे एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.(Coronavirus: गोवा येथे आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने आकडा 6 वर पोहचला) 

तर केंद्र आणि राज्य सरकारकडून अवाहन करण्यात येत आहे की, देशातील नागरिकांनी राज्याराज्यांमधे केले जाणारे स्थलांतरण टाळावे. देशातील विविध राज्यांतील नागरिक वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेलेले असतात. त्यांनी आपापल्या राज्यात परतण्याची आवश्यकता नाही. संबंधित राज्यांनी त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सींग पाळण्याच्या निर्णयाला बाधा येईल असे काहीही करु नका असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.