Vishwajit Rane (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रासह देशभरासह कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचसोबत कोरोनाच्या मृतांचा आकडा वाढत असून तो 53 वर जाऊन पोहचला आहे. तर नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढायचे असेल तर घरीच थांबा असे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा दिल्या जाणार आहेत. मात्र परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर ही बंदी घालण्यात आली आहे. परंतु यापूर्वी राज्यात आलेल्या नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. याच पार्श्वभुमीवर गोव्यात आता आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली असून कोरोनाबाधितांचा आकडा 6 वर पोहचला आहे.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीने मोझांबिक आणि केनिया येथून प्रवास करुन भारतात आला होता. या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यात आणखी एका कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. गोव्यात सध्या सर्व समुद्र किनारे, बार-पब्स आणि कॅसिनो बंद केले आहेत. तसेच राज्याची सीमा ही बंद करण्यात आली आहे.(5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च पेटवून कोरोनाचा अंधार दूर करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी ; 3 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

तर भारतात कोरोनाबाधितांची आकडेवारी गुरुवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आली. त्यानुसार देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2069 झाला असून 155 जणांवर उपचार केल्यानंतर प्रकृती सुधारली आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे 53 जणांना बळी आणि अॅक्टिव्ह रुग्ण 1860 आहेत. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या असून त्यााच आकडा 400 च्या पार गेला आहे.