राजस्थान मध्ये कोरोना बाधितांचा आकडा 179 वर; 3 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Apr 03, 2020 11:33 PM IST
कोरोना व्हायरसचे संकट भारत देशात अधिक दाट व्हायला लागले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पार गेली आहे. तर महाराष्ट्र सह केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब बनत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 9 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहे. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पहिल्यांदाच मोदी जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. यापूर्वी मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून जनतेचे मनोबल वाढवत इमोशनल नव्हे सोशल डिस्टसिंग वाढवा असा संदेश दिला होता.
महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार अधित सतर्क झाले आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईतील ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत ती ठिकाणी सील करण्यात आली असून जसलोक, सैफी यांसारखी नामांकीत हॉस्पिटल्स मधील रुग्णसेवाही काही प्रमाणात बंद करण्यात आली आहे. तसंच लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन अनेक स्तरातून सातत्याने करण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
इटली, स्पेन आणि अमेरिका या देशांमध्ये तर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जगावर घोंगवणाऱ्या या संकटाला परतवून लावण्यासाठी केंद्र सरकार सह राज्य सरकारही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश येण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.