COVID 19 Vaccination In India:  मुंबई पाठोपाठ दिल्लीतही कोरोना लस तुटवडा;  कंपन्यांकडून Vaccine आल्यानंतर होणार Vaccination
Coronavirus Vaccine | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीतही (Delhi ) कोरोना लसीकरण ठप्प झाले आहे. पुरेशा प्रमाणात कोविड 19 लस (COVID 19 Vaccine) उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण (Corona Vaccination) कार्यक्रम मंदावल्याचे आणि काही ठिकाणी ठप्प झाल्याचे दिल्ली सरकारने मह्टले आहे. लस उत्पादक कंपन्यांकडून लस उपलब्ध झाल्यानंतरच पुढील लसीकरण केले जाईल, असे दिल्ली सरकारने म्हटले आहे. कोरोना लसीकरणाबबत माहिती देताना दिल्ली सरकारने म्हटले आहे की, कोरोना लसीकरणसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज आहे. परंतू, आमच्याकडे लसच उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही लस मिळण्याची प्रतिक्षा करतो आहोत.

दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे की, दिल्लीमध्ये लसीकरण करण्यासाठी लसच नाही. त्यामुळे आमची लस उत्पादक कंपन्यांना विनंती आहे की, दिल्लीसाठी लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करुन द्यावी. दिल्ली सरकारकडून कोरोना लसीकरणासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परंतू, आमच्याकडे पुरशा प्रमाणात लस उपलब्ध नाही. आम्हाला समजले आहे की, लस उत्पादक कंपन्यांकडेही कोरोना लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे लस उत्पादक कंपन्यांनी आम्हाला कोरोना लस देण्याबाबत वेळापत्रक द्यावे. जेणेकरुन आम्ही त्या वेळेनुसार कोरोना लस आणि लसीकरण यांचे गणीत मांडून लसीकरण मोहीम राबवू, वृत्तसंस्था आयएनएसने याबाबत वृत्त दिले आहे.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन पुढे सांगतात, कंपन्यांकडून कोरोना लस उपलब्ध होताच आम्ही तातडीने लसीकरण सुरु करु. ही वेळ राजकारण करण्याची नाही. दिल्लीमध्ये सर्व काही पारदर्शी होते आहे. आम्ही कोणतीही गोष्ट लपवत नाही आणि पुढेही लपवणार नाही. आरोग्यमंत्री पुढे म्हणात, कोरना संक्रमनात दिल्लीमध्ये काहीशी घट झाली आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणाचा एक आशेचा किरण पाहायला मिळतो आहे. दिल्लीमध्ये लोकडाऊन लावल्याने आणि चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यानेही कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येते. दिल्ली सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी केली जात असल्याचेही सत्येंद्र जैन यांनी सांगितले.