Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus Vaccination: देशासह राज्यात येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानुसार काल (28 एप्रिल) दुपारी 4 वाजल्यापासून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना काही तांत्रिक अडचणी सुद्धा आल्या. त्यामुळे नागरिक कोविन किंवा आरोग्य सेतु अॅपमधून रजिस्ट्रिशन करताना तो क्रॅश होत असल्याचे सांगितले गेले. मुख्य बाब म्हणजे लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 कोटींहून अधिक नागरिकांनी त्यासाठी प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे.

MyGivInida च्या ट्विटर अकाउंटवरुन रजिस्ट्रेशन संदर्भातील अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांनी असे म्हटले की, कोरोनाचे महासंकट संपण्याच्या दिशेने टाकलेले हे लसीकरणाचे पाऊल अधिक महत्वाचे आहे. जगातील सर्वाधिक मोठ्या लसीकरण मोहिमेत कोविन अॅपवर 1 कोटींहून अधिक जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे.(Covid 19 In India: आयुष मंत्रालयाकडून कोविड-19 विषयक आयुर्वेद, युनानी उपचारपद्धतीबाबतची नवी नियमावली जारी)

Tweet:

महाराष्ट्रात राज्यात येत्या 1 मे पासून लसीकरण करणे थोडे अवघड असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे . कारण राज्यात 5 कोटींहून अधिक जण 18-45 वयोगटातील असून तेवढी लसींची उपलब्धता नाही आहे. त्यामुळे कोणत्या वयोगटाला प्रथम लस द्यावी हे आरोग्य विभागासह मंत्र्यांसह त्यावर चर्चा करुन ठरवले जाणार आहे.

दरम्यान, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ने आपल्या कोविशिल्ड लसीचे दर जाहीर केले आहेत. हे दर 1 मेपासून लागू असतील. दुसऱ्या बाजूला भारत बायोटेक कंपनीनेही त्यांच्या कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर केली आहे. खासगी रुग्णालयांसाठी ही लस आदर पुनावाला कोविशिल्ड लसीपेक्षाही काहीशी महाग प्रमाणात खरेदी करावी लागणार आहे. भारत बायोटेक कंपनीने माहिती दिली आहे.