Coronavirus Update: कोरोना रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ, 24 तासात नवे 6977 नवे रुग्ण; एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,38,845 वर तर आतापर्यंत 4,021 जणांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credit: Twitter)

देशातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus Update In India) संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासात देशात 6977 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तसेच 154 नव्य मृत्यूंची नोंद झाली आहे. सोमवारी 25 मे 2020 च्या ताज्या अपडेटनुसार सद्य घडीला देशात कोरोनाचे एकूण 1,38,845 रुग्ण आढळले आहेत, यामध्ये 77,103 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर आजपर्यंत एकुण 4,021 जणांंना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. दुसरीकडे एकुण 57,721 जणांनी कोरोनाच्या जीवघेण्या विषाणूंवर मात केली आहे. याबाबात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सविस्तर माहिती दिली आहे.

देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील असल्याचे दिसून येतेय. देशाच्या तुलनेत जवळपास 30% हुन अधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात असून सद्य घडीला त्यांची संख्या 50 हजार 231 वर पोहचली आहे. यापैकी 1, 635 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असुन 14,600 जणांनी या जीवघेण्या विषाणुवर मात केली आहे. तर महाराष्ट्राच्या पाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्ली,राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार राज्यनिहाय कोरोनाबाधितांची संख्या आता आपण जाणून घेऊयात.

देशातील कोरोनाबाधितांची राज्यनिहाय आकडेवारी

राज्य

Total Active

Total Deaths

Total Recovered

महाराष्ट्र

50231

1635

14600

तामिळनाडु

16277

111

8324

गुजरात

14056

858

6412

दिल्ली

13418

261

6540

राजस्थान

7028

163

3848

मध्य प्रदेश

6665

290

3408

उत्तर प्रदेश

6268

161

3538

पश्चिम बंगाल

3667

272

1339

आंध्र प्रदेश

2823

56

1856

बिहार

2587

13

702

कर्नाटक

2089

42

654

पंजाब

2060

40

1898

तेलंगणा

1854

53

1090

जम्मु-काश्मीर

1621

21

809

ओडिशा

1336

7

550

हरियाणा

1184

16

765

केरळ

847

4

521

आसाम

378

4

55

झारखंड

370

4

148

उत्तराखंड

317

3

58

छत्तीसगढ

252

0

67

चंदिगढ

238

3

186

हिमाचल प्रदेश

203

3

63

त्रिपुरा

191

0

165

गोवा

66

0

19

लडाख

52

0

43

पुद्दुचेरी

41

0

12

अंदमान निकोबार  बेटे

33

0

33

मणिपुर

32

0

4

मेघालय

14

1

12

दादरा नगर हवेली

2

0

0

अरुणाचल प्रदेश
1

0

1

मिझोराम

1

0

1

सिक्किम

1

0

0

एकुण

77103

4021

57720

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल देशातील नागरिकांना संबोधित करताना कोरोनाच्या धोक्याविषयी माहिती दिली. देशात कोर्नाबाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आता १३ दिवसांहून अधिक झाला आहे. तसेच मृत्युदर हा अगदी ०.२ टक्के इतकाच असून त्यांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी अधिक दिलासादायक आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र या घडीला काळजी घेणे अत्यावश्यक आहे.