Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Third Wave: केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी असे म्हटले की, जर सावधगिरी बाळगली नाही तर आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सुद्धा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. पुढे त्यांनी असे सुद्धा म्हटले की, सावधगिरी बाळगण्यासह गाइडलाइन्स सुद्धा फॉलो कराव्या लागणार आहेत. या व्यतिरिक्त काही ठिकाणी कोरोनाची तिसरी लाट येऊ सुद्धा शकते किंवा नाही असे राघवन यांनी म्हटले आहे. यापूर्वी गुरुवारी असे म्हटले की, देशात कोरोनाची तिसरी लाट जरुर येणार आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा धोका वाढण्याचा संभावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु जर सावधगिरी बाळगली तर काही ठिकाणी ती येणार नाही. त्याचसोबत विविध ठिकाणी कोरोनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.(कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत काही विशेष रेल्वे गाड्या रद्द- पश्चिम रेल्वे)

कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे आपण गाइडलाइन्सचे पालन करतो की नाही त्यावर निर्भर करते. व्यक्तिगत स्तर, लोकल, राज्य स्तरासह सर्व ठिकाणी सावधगिरी बाळगणे आणि गाइडलाइन्सचे पालन केल्यास तिसरी लाट येण्यापासून आपण बचाव करु शकतो. याबद्दल बोलणे किंवा ऐकणे मुश्किल आहे पण हे सगळं होऊ शकते.(COVID 19 In India: भारतामध्ये दिवसभरातील सर्वाधिक कोरोनाबधितांची नोंद; 24 तासांत 4,14,188 नवे रूग्ण, अ‍ॅक्टिव्ह रूग्णांचा टप्पा 36 लाखांच्या पार) 

Tweet:

भारतासह अन्य विविध ठिकाणी सुद्धा कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे हे समजणे गरजेचे आहे की, कोरोनाचे संक्रमण का वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अशा वेळी वाढतो जेव्हा त्याला मार्ग मिळतो. त्याचसोबत ज्या लोकांनी लस घेतली, मास्क घातला तरीही सावधगिरी बाळगावी. नागरिक सुरुवातीला काळजी घेत होते मात्र नंतर बेजबाबदारपणे वागू लागले. अशातच कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.