Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) ने अक्षरश: हैदोस घातला असून कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. देशात गेल्या 24 तासांत 2644 नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांची एकूण संख्या 39,980 इतकी झाली आहे. यापैकी 28,046 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 10,633 जणांनी कोरोनावर मात केली असून 1301 रुग्णांचा या विषाणूने बळी घेतला आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ गुजरात मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात सद्य स्थितीत 12,296 रुग्ण आहेत तर मृतांचा आकडा 521 वर पोहचला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील 2000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

तर त्यापाठोपाठ गुजरात मध्ये 5054 कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. भारतातील अन्य राज्यांत कोरोना चे किती रुग्ण जाणून घ्या राज्यनिहाय आकडेवारी

भारतातील कोणत्या राज्यांत किती आहेत COVID-19 रुग्ण; जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर 

S. No. Name of State / UT Total Confirmed cases (Including 111 foreign Nationals) Cured/Discharged/

Migrated

Death
1 Andaman and Nicobar Islands 33 16 0
2 Andhra Pradesh 1525 441 33
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 43 32 1
5 Bihar 481 107 4
6 Chandigarh 88 17 0
7 Chhattisgarh 43 36 0
8 Delhi 4122 1256 64
9 Goa 7 7 0
10 Gujarat 5054 896 262
11 Haryana 360 227 4
12 Himachal Pradesh 40 33 1
13 Jammu and Kashmir 666 254 8
14 Jharkhand 115 22 3
15 Karnataka 601 271 25
16 Kerala 499 400 4
17 Ladakh 22 17 0
18 Madhya Pradesh 2846 624 151
19 Maharashtra 12296 2000 521
20 Manipur 2 2 0
21 Meghalaya 12 0 1
22 Mizoram 1 0 0
23 Odisha 157 56 1
24 Puducherry 8 5 0
25 Punjab 772 112 20
26 Rajasthan 2770 1121 65
27 Tamil Nadu 2757 1341 29
28 Telengana 1063 458 28
29 Tripura 4 2 0
30 Uttarakhand 59 39 0
31 Uttar Pradesh 2487 689 43
32 West Bengal 922 151 33
Total number of confirmed cases in India 39980* 10633 1301
*124 cases are being assigned to states for contact tracing
*States wise distribution is subject to further verification and reconciliation
*Our figures are being reconciled with ICMR

Coronavirus In India Update: कोरोनाच्या 2644 नव्या रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या 39,980 वर; आजवर देशात 1301 मृत्यूंची नोंद, (जाणून घ्या आजची आकडेवारी)

तर जगभरात आतापर्यंत 34 लाखांहून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. जगभरात सद्य स्थितीत 2 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मृतांची एकूण संख्या 67,000 च्या वर पोहोचली आहे.