Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधातील लढाईसाठी SBI ची मदत, पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा करणार 100 कोटी रुपये
SBI & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरना व्हायरस (Coronavirus) संकटाविरोधात लढल्या जाणाऱ्या लढाईत आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI-Sate Bank of India) चे कर्मचारीसुद्धा उतरले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुमारे 2,56,000 कर्मचारी सुमारे 100 कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधी (PM National Relief Fund) मध्ये जमा करणार आहेत. एसबीआय कर्मचाऱ्यांनी आपले दोन दिवसांचे वेतन कोविड 19 या साथिच्या आजाराविरोधात लढण्यासाठी देण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, 2019-20 या आर्थिक वर्षाच्या एकूण नफ्यातील 0.25 टक्के रक्कम ही सीओव्हीआयडी-19 (Covid-19) संकटाचा सामना करण्यासाठी देण्याची घोषणा एसबीआयने गेल्याच आठवड्यात केली होती.

स्टेट बँक ऑफ इंडिया चेअरमन रजनशी कुमार (Rajnish Kumar, Chairman, SBI) यांनी म्हटले आहे की, एसबीआयसाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे की, बँकेचे सर्व कर्मचारी आपला दोन दिवसांचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधी साठी जमा करत आहेत. संपूर्ण देशाने एकजूट होऊन काम करण्याची ही वेळ आहे. आम्ही अशा या निर्णायक क्षणी भारतीय जनतेच्या आणि सर्व समूदायाच्या सोबत आमच्या परीने सर्व ते प्रयत्न करु. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संकटामुळे जगात मंदी पण Indian Economy मात्र सुरक्षित - संयुक्त राष्ट्र)

एएनआय ट्विट

एसबीआयने आपल्या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीत देण्याची घोषणा आज केली आहे. मात्र, गेल्याही आठवड्यात एसबीआयने असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला होता. एसबीआयने निर्णय घेतला होता की, आर्थिक वर्ष 2019-20 मधील एकूण नफ्याच्या 0.25 टक्के रक्कम ही कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी खर्स केली जाईल.