Shaheen Bagh protest cleared (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट दिल्ली शहरात अधिक वाढू नये यासाठी दिल्ली पोलीस (Delhi Police खबरदारी घेत आहेत. याच खबरदारीचा भाग म्हणून शाहीन बाग (Shaheen Bagh) परिसरही खाली करण्यात येत आहे. शाहीन बाग येथे नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) विरुद्ध आंदोलन गेली प्रदीर्घ काळ सुरु आहे. कोरोना व्हायरस संकट विचारात घेता इथल्या आंदोलकांनाही हटविण्यात येत आहे. एएनआय वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा परिसर खाली करण्यात आला आहे.

शाहीनबाग येथील आंदोलकांचा संपूर्ण तंबू खाली करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिल्ली शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करत दिल्ली पोलीस जमावाला हटविण्याचे काम करत आहेत. प्राप्त माहितीनुसार, दिल्ली शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असले तरी, शाहीन बाग येथील आंदोलक मात्र, आंदोलनावर ठाम होते. मात्र, पोलिसांनी आता हे आंदोलन हटवले आहे. (हेही वाचा, भारतात Coronavirus बाधित रुग्णांची संख्या 471 वर, तर 9 जणांचा मृत्यू)

एएनआय ट्विट

शाहीनबाग येथे गेली 100 दिवस आंदोलन सुरु होते. दिल्ली निवडणूक, असो जगभरात निर्माण झालेले कोरोना व्हायरस संकट असो. इथले आंदोलन सुरुच होते. खास करुन या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर कोणतेही संक्रमन टाळण्यासाठी हे आंदोलन हटविण्याचा निर्धार पोलिसांनी केला होता. कोरोना व्हायरस संकट विचारात घेऊन शाहीन बाग आंदोलकांनी पाच-पाच जनांच्या गटांनी एकत्र येत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी आता हे आंदोलन मोडीत काडले आहे.