कोरोना व्हायरसचा (Coronavirus) या विषाणूचा फैलाव आता झपाट्याने वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत. लॉकडाऊन (Lockdown), संचारबंदी (Curfew) लागू केली असूनही कोरोना चे रुग्ण मात्र वाढतच चालले आहे. आतापर्यंत आलेल्या रिपोर्टनुसार, भारतात (India) कोरोना ग्रस्तांची संख्या आता 471 वर जाऊन पोहोचली आहे. तर यातील 9 जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा आकडा खूपच धक्कादायक असून ही स्थिती लवकरात लवकर आटोक्यात आली नाही याचे गंभीर परिणाम भारतावर होऊ शकतात, असे एकूणच चित्र निर्माण झाले आहे. देशभरात 548 जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहेत. जगभरात कोरोना ग्रस्तांचा आकडा हा 4 लाखांच्या वर जाऊन पोहोचला आहे.
ही स्थिती खूपच चिंताजनक असल्यामुळे जर यावर काही तोडगा निघाला नाही तर सर्व अवघड होऊन बसेल. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली असून सध्या आपण कोरोनाच्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच नियम मोडू नका अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे कडक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत.
हेदेखील वाचा- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाअंतर्गत विमान वाहतूक सेवा 24 मार्च च्या मध्यरात्रीपासून बंद; सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस ग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना चे चित्र पाहायला मिळत आहे. हा आकडा आता 97 वर गेला असून 8 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच सर्व प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक असलेल्या रिक्षामध्ये आता एकाच प्रवाशाला बसण्याची मुभा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर थाळ्या आणि टाळ्या वाजवणं म्हणजे व्हायरस घालवणे नाही असे कडक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सुनावले आहे.