Coronavirus: बनारस हिंदू विद्यापीठातील कोरोना व्हायरस संक्रमित सेवानिवृत्त प्रोफेसरचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

बनारस हिंदू विद्यापीठातील (Banaras Hindu University) आयुर्वेद विभागाच्या एका सेवानिवृत्त प्रोफेसरचे निधन झाले आहे. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. बीएचयूच्या सुपर-स्पेशालिटी विंगमध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रोफेसरच्या रुपात कोरना व्हायरसमळे वाराणसी येथे झालेला हा चौथा मृत्यू आहे. वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी म्हटले आहे की, शिवाला परिसरात राहणाऱ्या 80 वर्षी सेवानिवृत्त प्रोफेसर यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालावत गेली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

ज्या प्रोफेसरचा कोरोनामुळे मृत्यू झाला ते प्रोफेसर बनारस हिंदू विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे प्रमुखही राहिल आहेत. दरम्यान, या आधी कोरोना व्हायरस एका 73 वर्षीय सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. हा कर्मचारी लंका येथील रहिवासी होता. त्यांचा मृत्यू 16 मे या दिवशी बीएचयू रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (हेही वाचा, अयोध्येत भाजपा नेते जय प्रकाश सिंह यांची गोळी घालून हत्या)

दरम्यान, लल्लापुरा येथील हाइपोथायरायडिज्म, उच्च रक्तदाब आणि मधुमेह पीडित रुग्ण 58 वर्षीय महिलेचाही श्वसन विकारामुळे 14 मे रोजी मृत्यू झाला. या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्याही आधी कोलकाता येथून परतलेल्या एका व्यापाऱ्याचा 3 एप्रिल रोजी मृत्यू झाला. या व्यापाऱ्याचीही कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. या व्यापाऱ्याची कोरोना व्हायरस चाचणी 4 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आली होती.