देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) संक्रमणांची संख्या वाढतच आहे. परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांद्वारे या विषाणूने भारतात शिरकाव केला व आता त्याने आपले महाकाय रूप धारण करायला सुरुवात केली आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकारने अनेक सेवा बंद केल्या आहेत. लोकांनी स्वतःला आयसोलेट करावे असे सांगितले गेले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने (Central Railway) आपल्या अनेक रेल्वे काही कालावधीकरिता रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, निझामाबाद एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, मनमाड एक्सप्रेस अशा महत्वाच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
देशातील बर्याच शहरांमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मंगळवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता, मध्य रेल्वेने अनेक गाड्याही रद्द केल्या आहेत. महाराष्ट्रात येणार्या रद्द केलेल्या गाड्यांची संख्या 23 आहे. त्यातील काही मार्च अखेरपर्यंत तर काही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
Trains cancelled due #COVID19 preventive measure and non-occupancy. pic.twitter.com/NdGgrrR9Gv
— Central Railway (@Central_Railway) March 17, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी महाराष्ट्रात काही नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे कदाचित शासन सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकेल. (हेही वाचा: राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं 7 दिवस राहणार बंद, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कचेऱ्या मात्र सुरु- सूत्र)
रद्द झालेल्या रेल्वेगाड्या -
11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस 19.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत
11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस 18.3.2020 ते 30.3.2020 पर्यंत
11201 एलटीटी-अजनी एक्सप्रेस 23.3.2020 आणि 30.3.2020 पर्यंत
11202 अजनी-एलटीटी एक्सप्रेस 20.3.2020 आणि 27.3.2020 पर्यंत
11205 एलटीटी-निजामाबाद एक्सप्रेस 21.3.2020 आणि 28.3.2020 पर्यंत
11206 निजामाबाद-एलटीटी एक्सप्रेस 22.3.2020 आणि 29.3.2020 पर्यंत
22135/22136 नागपुर-रीवा एक्सप्रेस 25.3.2020 पर्यंत
11401 मुंबई-नागपुर नंदीग्राम एक्सप्रेस 23.3.2020 ते 1.4.2020 पर्यंत
11402 नागपुर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस 22.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत
11417 पुणे-नागपुर एक्सप्रेस 26.3.2020 आणि 2.4.2020 पर्यंत
11418 नागपुर-पुणे एक्सप्रेस 20.3.2020 आणि 27.3.2020
22139 पुणे-अजनी एक्सप्रेस 21.3.2020 आणि 28.3.2020 पर्यंत
22140 अजनी-पुणे एक्सप्रेस 22.3.2020 आणि 29.3.2020 पर्यंत
12117/12118 एलटीटी-मनमाड एक्सप्रेस 18.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत
12125 मुंबई-पुणे प्रगति एक्सप्रेस 18.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत
12126 पुणे-मुंबई प्रगति एक्सप्रेस 19.3.2020 ते 1.4.2020 पर्यंत
22111 भुसावळ-नागपुर एक्सप्रेस 18.3.2020 ते 29.3.2020 पर्यंत
22112 नागपुर-भुसावळ एक्सप्रेस 19.3.2020 ते 30.3.2020 पर्यंत
11307/11308 कालाबुरागी-सिकंदराबाद एक्सप्रेस 18.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत
12262 हावड़ा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस 24.3.2020 आणि 31.3.2020
12261 मुंबई-हावड़ा दुरंतो एक्सप्रेस 25.3.2020 आणि 1.4.2020
22221 20, 23, 27 आणि 30.3.2020 पर्यंत CSMT-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
22222 निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्सप्रेस 21, 24, 26 आणि 31.3.2020 पर्यंत
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 40 झाली आहे आणि देशभरात कोरोना रूग्णांची संख्या 137 झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आजपासून पुढील 7 दिवसांपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा सोडून, इतर सर्व शासकीय कार्यालये बंद केली आहेत. यामध्ये आधार कार्ड नुतनीकरण व नवीन परवाने देण्याचे कामही 31 मार्च पर्यंत थांबवण्यात आले आहे.