कोरोना व्हायरसचे (Coronavirus) महाभयंकर संकट सध्या देशावर आहे. कोरोनाचा प्रभाव अधिक वाढू नये म्हणून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) घेण्यात आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी देशवासियांनी एकजूट दाखवावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवे लावण्याची संकल्पना मांडली. देशवासियांनी आज 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता दिवा लावून लॉकडाऊनमुळे खचलेल्या आणि कोरोनाच्या संकटामुळे घाबरलेल्या लोकांचे मनोबल वाढवावे असे आवाहन मोदींनी शुक्रवारी (3 एप्रिल) केले. कोरोना व्हायरस संकटाचा अंधःकार दूर करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या दारात किंवा गॅलरीत 9 मिनिटांसाठी दिवा, मेणबत्ती लावावी किंवा मोबाईल टॉर्च ऑन करावा असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. आज 5 एप्रिल असल्याने त्यांनी केलेल्या आवाहनाची आठवण करुन देताना मोदींनी अगदी 'शॉर्ट अॅण्ड स्वीट' ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा 'आयो दीयां जलाएं' कवितेचा खास व्हिडिओ (Watch Video)
पंतप्रधान मोदींनी #9pm9minute असे ट्विट केले आहे. मोदींच्या या ट्विटवर प्रतिक्रीयांचा वर्षाव होत आहे. काल मोदींनी भाजपचे जेष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा 'आयो दीया जलाएं' या कवितेचा व्हिडिओ शेअर केला होता. दिवे लावण्यासाठी मोदी ट्विटच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहित करत आहेत.
नरेंद्र मोदी ट्विट:
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2020
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 12 तासांत कोरोनाचे 302 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3374 वर पोहचला आहे. तर यापैकी उपचारानंतर बरे झालेल्या 267 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसंच कोरोनाने देशात आतापर्यंत 77 लोकांचा बळी घेतला आहे.